शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : शिवसेना-काँग्रेस आघाडीची पुन्हा सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:31 IST

येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी रोहा येथील तहसील कार्यालयात पार पडून सरपंचपदाचे शिवसेना-काँग्रेस आघाडीचे उमेदवार

नागोठणे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी रोहा येथील तहसील कार्यालयात पार पडून सरपंचपदाचे शिवसेना-काँग्रेस आघाडीचे उमेदवार विद्यमान ग्रा. पं. सदस्य मिलिंद धात्रक यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे लक्ष्मण टके यांचा ३२१ मतांनी पराभव करीत विजय प्राप्त केला. माजी सरपंच, भाजपा पुरस्कृत आघाडीचे विलास चौलकर यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत सेना काँग्रेस आघाडीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत उपसरपंचपद आपल्याकडेच ठेवल्याचे स्पष्ट होत असून, गत निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीने आणखी ४ जागा जिंकत या वेळी ६ सदस्य निवडून आणले आहेत.या निवडणुकीत प्रभाग क्र मांक २च्या सेनेच्या पूनम इप्ते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा कोळी यांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी उडविण्यात येऊन त्यात कोळी यांचे नाव आल्याने त्या विजयी झाल्याचे घोषित केले. या निवडणुकीत विद्यमान उपसरपंच शैलेंद्र देशपांडे यांनी २७ मतांनी निसटता विजय मिळवला असला, तरी सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकण्याची त्यांनी किमया साधली आहे. इतर विद्यमान ७ सदस्यांपैकी प्रकाश मोरे वगळता सुरेश जैन, अकलाख पानसरे, दिलनवाज अधिकारी, मोहन नागोठणेकर, रंजना राऊत आणि सुप्रिया महाडिक हे उमेदवार पुन्हा विजयी झाले. इतर १० सदस्य पहिल्यांदाच सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत पक्ष बाजूला ठेऊन काही तथाकथित नेते इतर पक्षातील सदस्यांना निवडून आणण्यासाठी मते मागत असल्याचे त्या निमित्ताने उघड झाले आहे.वारळवर युतीचा झेंडा-लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीवर शिवसेना-काँग्रेस युतीचा झेंडा फडकला असून, सात पैकी पाच उमेदवार युतीचे तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदाच्या शर्यतीतही सेना-काँग्रेस युतीचाच उमेदवार विजयी झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुपडा साफ झाल्याचे चित्र स्पष्टझाले आहे. भारतीय जनता पार्टीला आपला खातेदेखील उघडता आले नाही.वारळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्र.३च्या निवडणुकांमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले असून, या प्रभागात विजयी उमेदवाराला १४० तर नोटाला १३३ मतदान पडल्याने सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत युतीचे रमेश खोत विजयी झाले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाgram panchayatग्राम पंचायतcongressकाँग्रेस