शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मुरुडमध्ये नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:54 IST

२० वर्षे नाल्यासाठी संघर्ष; पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग रोखल्याने संताप

आगरदांडा : मुरुड-शेगवाडा येथील नेताजी सुभाषचंद्र मार्गावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी गेली २० वर्षे नागरिकांचा नाल्यासाठी संघर्ष चालू आहे. मुरुड आगार, गणेश पाखाडी, भोगेश्वर पाखाडी आदी भागातून वाहणारे पावसाचे पाणी शेगवाडा येथील मुख्य नाल्यातून समुद्रात जाते. मात्र, मुरुड नगरपरिषदेने या मुख्य नाल्यात चार सिमेंटचे पाइप टाकून वर बांधकाम करून पाण्याचा प्रवाह खंडित केला आहे. त्यामुळे नाल्याचा आकार कमी झाल्याने हे मोठा पाऊस झाल्यास हे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी संतप्त होऊन गुरु वारी मुरुड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना तसेच प्रभागातील नगरसेवकांना घेराव घातला.मुरुड नगरपरिषदेने या नाल्यावरील केलेले बांधकाम हे नगरपरिषदेने प्रमाणित केलेल्या प्रारंभ प्रमाणपत्र अन्वेय जमिनीपासून आठ फूट उंची व २० फूट रुंदी करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपरिषदेने हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह शेगवाडा बागायतीत व घरांमध्ये शिरून आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. तरी बांधलेले बांधकाम दोन दिवसांच्या आत नगरपरिषदेने न तोडल्यास आम्ही ते बांधकाम तोडू, असा इशारा मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा कार्यालयामध्ये शेगवाडातील नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना घेराव घालून दिला. संदर्भात जाब विचारण्यात आला आहे. शेगवाडा येथील नाल्याबाबत निवेदन देऊनसुद्धा उपाययोजना झाली नाही. आमचा प्रश्न स्थानिक नगरसेविकांनी सभेमध्ये मांडला पाहिजे होता. मात्र, सभेमध्ये विषय मांडला गेला नाही यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.नाल्याचे बांधकाम साइटची उंची आठ फूट ठेवायची आहे. स्लॅब व जमीन या मध्ये आठ फूट अंतर ठेवणे आवश्यक होते; परंतु नगरपरिषदेने तसे न करता कमी फुटांमध्ये बांधकाम केल्याने येणाºया पावसात पुन्हा नागरिकांचे हाल होऊन आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. १४ जून २०१९ च्या जनरल सभेत याबाबत विचार केला जाईल, असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते; परंतु या अर्जाचा जनरल सभेत साधा विचारही न केल्यामुळे नागरिकांनी जाब विचारला.या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, गटनेते मुग्धा जोशी, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेवक प्रमोद भायदे, बांधकाम सभापती अशोक धुमाळ, नेताजी सुभाषचंद्र बोस मित्रमंडळ अध्यक्ष सुधीर पाटील आदीसह शेगवाडातील नागरिक उपस्थित होते.सभेत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनमुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न के ला, तेम्हणाले की ज्या वेळी बांधकाम चालू होते, त्या वेळी स्थानिक नागरिकांनी काम बंद करायला पाहिजे होते. त्यावर स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आम्ही निवडून दिलेल्या स्थानिक नगरसेवकांचे काम होते, त्यांना माहीत आहे की नाल्याचा ज्वलंत प्रश्न शेगवाडीतील नागरिकांना सतावत आहे. हा विषय त्यांनी मांडणे आवश्यक होता. हा संघर्ष गेले २० वर्षे चालू आहे. होणाºया आर्थिक नुकसानाला नगरसेवक जबाबदार राहतील, असा इशारा नागरिकांनी दिला. या संदर्भात ताबडतोब विशेष जनरल सभा लावून योग्य तो निर्णय तुम्हाला देऊ, असे आश्वासन या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिले.येत्या दोन दिवसांत बांधकाम तोडले नाही तर हे काम येथील नागरिक तोडून टाकतील, असा इशारा दिला आहे. यामुळे नगरपरिषद या बाबतीत कोणता निर्णय घेणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे.नाल्याचे बांधकाम करताना स्लॅब व जमीन यामध्ये आठ फूट अंतर ठेवणे आवश्यक होते; परंतु नगरपरिषदेने तसे न करता कमी फुटांमध्ये बांधकाम के ले आहे.