शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:37 IST

नव्या उमेदीने कामाचा शुभारंभ : कर्ज काढून घेतल्या नवीन हातगाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : मुरुड समुद्रकिनारी सुमारे ४४ टपरीधारक असून, या लोकांचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता या टपरीधारकांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्याही बनवण्यात आल्या असून, पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

चहाटपरी त्याचप्रमाणे, अल्पोहर व भोजन बनवून देणाऱ्या सर्व टपºया संचारबंदीमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने या भागात रेलचेल दिसून येत आहे. अल्प प्रमाणात पर्यटकही दाखल होत असल्याने, या टपरीधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अनेक टपरीधरकांनी सांगितले की, पाऊस कमी असेल, तर पर्यटक जास्त प्रमाणात येतात, परंतु मुसळधार पाऊस पडत आमच्या व्यवसायात मोठी घट झाली आहे. जंजिरा किल्ला पर्यटकांना खुला झाल्यावर पर्यटक संख्या वाढून व्यवसाय सुरळीत होतील, असे टपरीधारकांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाची मदत अनेक टपरीधारकांना मिळालेली नाही, तरीही मोठ्या प्रमाणात दुकाने उघडण्यात आली आहेत. याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निसर्ग चक्रीवादळात बहुतावशी टपऱ्यांचे नुकसान झाले आहे.यातील काही टपरीधारकांनी कर्ज काढून आपल्या हातगाड्यांची दुरुस्ती करून घेतली आहे, तर काही जण दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. कठीण परस्थिती असतानाही आपले दु:ख विसरून टपरीधारकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.