शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जागा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करा; मोजणीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

अलिबाग : तालुक्यातील विर्त-सारळ ग्रामस्थांची कोट्यवधी किमतीची गुरचरण जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या जागेच्या मोजणीला बुधवारी विरोध केल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरचरण जमीन ही गावठाण विस्तारासाठी वापरण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विर्त-सारळ हे रेवस आणि मांडवा या बंदराला खेटून असणारे गाव आहे. प्रत्येक गावासाठी गुरचरण जमिनी दिलेली असते. विर्त-सारळ गावासाठी तब्बल साडेतेरा एकर जमीन वाट्याला आलेली आहे. या जमिनीवर सुमारे दीडशे वर्षांपासून ग्रामस्थांचा हक्क आहे. मध्यंतरी काही दलालांनी पंचांची नावे वगळून आपली नावे सातबारावर लावली. त्यानंतर ग्रामस्थांना अंधारात ठेवून एका खासगी बिल्डरला विकण्यात आली असे आगरी शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.अलिबाग तालुका हा एमएमआरडीए क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे येथील जमिनीला मुंबई-नवी मुंबई सारखा कोट्यवधी रुपयांचा दर आला आहे. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून दलालांनी गुरचरण जमिनीचा व्यवहार करून जमीन खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या जमिनीचा बाजारभावानुसार सुमारे २६० कोटी रुपयांचे मूल्य होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यामध्ये विविध सरकारी अधिकारी, दलाल यांचे हात ओले झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमिनी विक्रीचा व्यवहार रद्द करून ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी राजाराम पाटील यांनी यावेळी केली.बुधवारी लावण्यात आलेल्या जमीन मोजणीला ग्रामस्थ विरोध करणार असल्याचे लक्षात घेऊन प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थांनी याही परिस्थितीत मोजणीला प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून तो हाणून पाडला. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.गाव विस्तारासाठी केली होती जागेची मागणीगुरचरण जमीन ही संबंधित गावाच्या विस्तारासाठी असते. त्याचप्रमाणे याच जमिनीचा वापर पिढ्यानपिढ्या गुरांना चरण्यासाठी, गोठे बांधणे, काही प्रमाणात शेतीचा व्यवसायही करण्यासाठी केला जातो. गावातील कुटुंबांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावाचे विस्तारीकरण गुरचरण जागेत करावा अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि भूमिअभिलेख विभागाकडे केली होती मात्र त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, असे विर्त सारळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वार्डे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.ग्रामस्थांवर खोट्या तक्रारी दाखल करून त्रास दिला जात आहे. या जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे असे असताना प्रशासनाने जमिनीची मोजणी करणे बेकायदेशीर असल्याचे अ‍ॅड.राकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग