शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये मोटरसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:11 IST

रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

रायगड : जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, पेण तालुक्यातून मोटरसायकल चोरी करणारी टोळी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केली आहे. याप्रकरणी अलिबाग आणि उत्तराखंड येथून चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. एकूण ३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

रायगड जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी मोटरसायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली या मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दोन पथके स्थापन करून चोरांचा तपास सुरू केला होता.

सातत्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संकेत जामकर आणि संकेश जाधव या दोन जणांना थळबाजार येथून ताब्यात घेतले. चौकशीनंतर अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ बुलेट, १ पॅशन प्रो, १ टीव्हीएस एन्टॉक, १ सुझुकी बॅगमॅन स्ट्रीट आणि एक यामाहा एफ झेड अशा पाच दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या. तपासादरम्यान आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले. त्यांना उत्तराखंड येथून ताब्यात घेण्यात आले. शुभम कश्यप आणि आशिष पन्वार अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून बुलेट, पॅशन प्रो आणि पल्सर अशा ३ गाड्या जप्त केल्या.पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उप-निरीक्षक महेश कदम, सहायक फौजदार सी. बी. पाटील, पोलीस हवालदार बंधू चिमटे, पोलीस हवालदार हणमंत सूर्यवंशी, अमोल हंबीर, सचिन शेलार, परेश म्हात्रे, प्रतीक सावंत देवराम कोरम, अनिल मोरे यांनी  तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

सातत्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संकेत जामकर, संकेश जाधव या दोघांना थळबाजार येथून ताब्यात घेतले. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी