शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रायगड जिल्ह्यात डासांचा जाच वाढला; हत्तीरोगाचे २२९ रुग्ण आढळले

By निखिल म्हात्रे | Updated: June 28, 2024 14:56 IST

पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत.

अलिबाग : हत्तीरोगाचे रायगड जिल्ह्यात २२९ रुग्ण आहेत. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा राबवून तो जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. अलिबाग आणि पनवेल तालुक्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग हा आजार होतो. सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या पायावर सूज येऊन हालचालींवर एका प्रकारचे निर्बंध येतात. इतरांच्या मदतीशिवाय हे रुग्ण हालचाल करू शकत नाही.

पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २२९ रुग्ण आहेत. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या या आजाराच्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. सीएससी सेंटरवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रुग्णास आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह रक्त गट, मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. शिबिरास येताना ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रत सोबत आणणे गरजेचे आहे.रायगडमधील हत्तीरोग रुग्णांची संख्या

अलिबाग- ५६, उरण- ३१, पनवेल- ४७, कर्जत- ७, खालापूर- ९, सुधागड- ५, पेण- २८, मुरूड- १२, रोहा- ११, माणगाव- १२, तळा- १, म्हसळा- १, श्रीवर्धन- १, महाड- ४, पोलादपूर- ४, एकूण- २२९हत्तीरोगाची लक्षणे

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात. जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणे दिसून येऊ शकतात.

लक्षणविरहित किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तीव्र लक्षण अवस्थेत ताप येतो, लसिकाग्रंथींचा दाह सुरू होतो.वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे हत्तीरोगाच्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून ज्याचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा जास्त आहे, त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच हत्तीरोग जिल्ह्यातून हद्दपार व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.-राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड