शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

रायगड जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा अधिक असंघटित घरेलू कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:22 IST

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून घोषित केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग - कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून घोषित केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळात ‘कमवा आणि शिका’ अशी योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता अमलात आणली. ‘कमवा’ या संज्ञेतून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना श्रमाचे अनन्य साधारण महत्त्व पटून दिले. त्याच वेळी ‘शिका’ या संज्ञेतून बौद्धिक विकासाचे सूत्र दिले. बौद्धिक विकास आणि श्रमाची साथ या सूत्रातून स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास, असे सूत्र त्यामागे होते.विज्ञानाच्या माध्यमातून विकासाची कास धरण्यात आली असली, तरी समाजातील कष्टकरी आणि श्रमजीवींची संख्याही प्रचंड मोठी आहे. त्यांच्या श्रमाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही नकारात्मक असून कष्टकरी आणि श्रमजीवीकरिता सक्रिय कार्यरत अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचा आहे.श्रमजीवी कामगारांची समस्या अत्यंत गंभीर असून, मुळात हा वर्ग असंघटित आहे. घरेलू कामगार या सदरात मोडणाऱ्या ‘मोलकरीण’ या घटकाची समस्या गंभीर असल्याची माहिती या मोलकरीण या असंघटित श्रमजीवींच्या समस्या निराकरणाकरिता वाघाई घरकाम संघटनेच्या माध्यमातून कार्यरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली आहे.पेण तालुक्यात दोन हजार ३०० मोलकरणी वाघाई घरकाम संघटनेच्या सदस्य आहेत. रायगड जिल्ह्यात मोलकरणींची संख्या ५० हजारांच्या वर आहे. त्याच्या श्रमाचे मोल ठरवताना वा त्यांच्या समस्यांकडे अनेकजण सकारात्मक नसल्याचे दिसून आले.राज्यात १.५ दशलक्ष घरेलू कामगारघरेलू कामगार यांचे काम अंशकालीन स्वरूपाचे असून, ते एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करतात. त्यांच्या कामाचे तास हे ठरावीक नसतात. त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जाते, असे सरकारी सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. शहरांत ज्याप्रमाणे नोकरदार महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचप्रमाणे घरेलू कामगार महिलांची संख्याही वाढत आहे. कामगार विभागाच्या सर्व्हेनुसार सुमारे १.५ दशलाखांपेक्षा जास्त घरेलू कामगार, तर चार ते पाच दशलाख मालक राज्यात आहेत.एकल महिलांचे प्रमाण सर्वाधिकमोलकरीण या घटकामध्ये येणाºया महिला या मुळात भूमिहीन वा अल्पभूधारक कुटुंबातील, विधवा, परित्यक्त्या आणि सर्वाधिक या ‘एकल महिला’ असल्याने त्यांचे प्रश्न सर्वसाधारणपणे कुणाच्या लक्षात न येण्यासारखे आहेत. मुळात त्या प्रश्न मांडू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याचे मार्गच खुले होत नसल्याचे पाटील सांगतात.सकारात्मक दृष्टिकोन हवामहाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम-२००८ या कायद्याची अंमलबजावणी ज्या प्रभावीपणे होणे अपेक्षित आहे, त्या प्रकारे होत नसल्याने शासनाकडे या कायद्यांतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगारांची संख्या अत्यल्प आहे. या कायद्यांतर्गत ‘आॅनलाइन’ नोंदणी करणे अनिवार्य आहे, ते घरेलू कामागारांकरिता केवळ अशक्य आहे. कारण तो मुळात असंघटित कामगार आहेत. शासकीय यंत्रणेनेच याकरिता विशेष नियोजन करणे आवश्यक आहे. शासनाकडून मिळू शकणारे आर्थिक लाभ वा अन्य सुविधा मोलकरणीला मिळण्याकरिता घरमालकांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या