शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून पर्यटन, ट्रेकिंगसाठी नोंदणी सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 04:04 IST

पर्यटनासाठी गड-किल्ल्यांवर आलेले पर्यटक अनेकदा रस्ता न सापडल्याने जंगलात भरकटतात, तर काही जण डोंगर दऱ्यांची अचूक माहिती नसल्याने जीवास मुकतात.

अलिबाग : पर्यटनासाठी गड-किल्ल्यांवर आलेले पर्यटक अनेकदा रस्ता न सापडल्याने जंगलात भरकटतात, तर काही जण डोंगर दऱ्यांची अचूक माहिती नसल्याने जीवास मुकतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यात प्रबळगड, पेठकिल्ला, इर्शाळगड या गड-किल्ल्यांवर येणारे पर्यटक व ट्रेकर्सची नोंदणी वन विभागाकडून करण्यात येणार आहे. याशिवाय गडांवर जाणाºया ट्रेकर्संनी स्थानिक युवकांना गाइड म्हणून सोबत घेवून जावे, त्याचबरोबर ट्रेकिंगला जाण्यापूर्वी नाव नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी अपघात होऊन पर्यटकांचे मृत्यू होणाºयांची संख्या गतवर्षी मोठी होती. ही जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली.पर्यटकांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा, मद्यपान करून धबधब्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा ठिकाणी यंदा मद्यपानास बंदीही घालण्यात आली आहे. यावर्षी पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धबधब्याच्या ठिकाणी व परिसरामध्ये मद्य विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे धबधब्याच्या ठिकाणी तपासणी पथक कार्यरत राहील. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून बचाव साहित्य व सूचना फलक लावण्यात यावेत. होमगार्ड, संयुक्त वन व्यवस्थापन समिती जीवरक्षक नेमण्यात यावेत, अशा सूचना देखील सूर्यवंशी यांनी दिल्या असून पावसाळ्यातील पर्यटक मृत्यू रोखण्यासाठी या उपाययोजनेस सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Fortगड