शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची वीज महावितरणने कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:07 IST

येथील ग्रामीण रु ग्णालयाचे तब्बल ७८,७८० रुपयांचे वीज बिल थकविल्याने मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास महावितरणने वीज कापली

म्हसळा : येथील ग्रामीण रु ग्णालयाचे तब्बल ७८,७८० रुपयांचे वीज बिल थकविल्याने मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास महावितरणने वीज कापली. ग्रामीण रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागला.मार्च २०१७पासून आजतागायत रुग्णालय वापरत असलेल्या विजेचे बिल न भरल्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयावर विद्युत पुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढावली आहे. म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होऊन जवळपास चार वर्षे झाली आहेत; परंतु शासनाच्या विविध विभागांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे आजतागायत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे या ग्रामीण रुग्णालयाची इमारत हस्तांतरित केली गेली नाही, यामुळे या इमारतीत एकाच वेळी ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, असे आरोग्याचे दोन विभाग कार्यरत असल्यामुळे वीज बिल कोणी भरावे, ही अडचण असल्याचे दोन्ही विभागांचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत; परंतु या विभागाच्या तांत्रिक अडचणी असल्या तरी सरकारी रु ग्णालयाच्या उपचारांवर अवलंबून असणाºया रु ग्णांचे मात्र यामुळे हाल होत आहेत.विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रसूतिगृह, प्रयोगशाळा, रुग्ण कक्ष सेवा ठप्प होऊन हजारो रुपयांच्या वेगवेगळ्या लस वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांच्या वीज देयक भरण्याचे आश्वासनानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.