शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 02:53 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील पुलाच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत

- सिकंदर अनवारे दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील पुलाच्या पृष्ठभागावर भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी पुलाचा भाग खचल्यासारखा दिसतो. जुन्या पुलाला लागून या ठिकाणी नवीन व रुंद पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र काही अंतरावरच चौपदरीकरणाच्या पुलाच्या कामासाठी नदीत मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. पुलावर वाढलेले वृक्ष आणि वाहनांच्या हादऱ्यांमुळे पुलावरील भागाला तडे गेले आहेत. सदर पुलाची पाहणी करु न दुरु स्ती न केल्यास सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुंबई -गोवा महामार्गावर ३०० च्या आसपास ब्रिटिशकालीन बांधकाम केलेले छोटे-मोठे पूल आहेत. २०१६ मध्ये घडलेल्या महाड येथील सावित्री पूल दुर्घटनेने या ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट आणि दुरु स्ती हा विषय पुढे आला होता. मात्र केवळ पाहणी आणि साफसफाई व्यतिरिक्त या ठिकाणी काहीच करण्यात आलेले नाही. महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी येथील सावित्री पूल आणि मोहोप्रे येथील गांधारी पूल हे दोन मोठे पूल असून यावरु न अवजड आणि हलके अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. हा देखील ब्रिटिश कालीन टू आर्च बांधकाम पद्धतीचा पूल आहे. हा पूल उंच आणि अरुंद असल्याने दहा वर्षापूर्वी याच पुलाला लागून या ठिकाणी काँक्रीटचा पूल जोडण्यात आला.नवीन बांधकामामुळे पुलाची रु ंदी वाढल्याने वाहतूक सुरळीत होवू शकली. मात्र या ठिकाणी १00 वर्षांपूर्वीचे बांधकामासोबत आधुनिक पद्धतीच्या सिमेंट काँक्रीटच्या बांधकामाची सांगड घालण्यात आली आहे. याच पुलाच्या शेजारी नदीत चौपदरीकरणाच्या पुलाचे नव्याने काम सुरु आहे. यासाठी या ठिकाणी मोठ मोठे खंदक खोदून खोदकाम करण्यात आले आहे. तसेच नदीच्या पाण्याचा प्रवाहही बदलण्यात आला आहे.पुलाभोवती मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असून दगडांच्या बांधकामातील भेगांमधून पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून या पुलाच्या पृष्ठभागावर भेगासदृश चिरा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी गोलाकार पद्धतीचे भाग काही इंचांनी खचला आहे. पुलावरील होणारी अवजड वाहतूक पाहता सदर पूल हा धोकादायक स्थितीत अल्याचे दिसत आहे. या कामी महामार्ग बांधकाम विभागाची भूमिका महत्त्वाची असून, तत्काळ या पुलाची पाहणी करून योग्यती दुरु स्ती करण्याची गरज आहे.>मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी येथील सावित्री पूल आणि मोहोप्रे येथील गांधारी पूल हे दोन मोठे पूल असून अवजड आणि हलकी अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. हा देखील ब्रिटिशकलीन टू आर्च बांधकाम पद्धतीचा पूल आहे.