शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात चलाखी! मोदी सरकारनं तुमच्या खिशातून २२५ रुपये काढले अन् १० रुपयेच दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:57 IST

सिलिंडर स्वस्ताई नावालाच, गृहिणींमध्ये नाराजी

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : गेल्या काही दिवसांत सातत्याने सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने गृहिणींचे अर्थकारण बिघडले आहे. मात्र, नुकतीच सिलिंडरच्या दरामध्ये १० रुपये घट करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात तब्बल २२५ रुपये दर वाढवण्यात आले असून १० रुपयांची स्वस्ताई दाखवत चलाखी करण्यात आल्याने गृहिणींसह नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर करतात. गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच या सिलिंडरच्या किमतीत कपात झाली आहे. गेल्या वर्षभरात २२५ रुपयांनी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, तर ४ फेब्रुवारी रोजी या सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ झाली. १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपये वाढले. त्यानंतर २५ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी २५ रुपयांनी किमती वाढल्या होत्या.लॉकडाऊन काळात रोजगार हिरावल्याने नागरिकांना आर्थिक चणचण सहन करावी लागली. शिवाय या घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदानही शासनाने बंद केल्याने आर्थिक गळचेपी झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. सामान्य नागरिक पुन्हा एकदा चूल पेटवण्याकडे वळला. काही राजकीय पक्षांनी या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. दरम्यान, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांकरिता सिलिंडर किमतीतील घट दिलासा देणारी बाब असली, तरी केवळ १० रुपयांचीच कपात झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसल्याची चर्चा सगळीकडे रंगत असून नाराजीचा सूर उमटत आहे.घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ नोंदविण्यात आल्याने स्वयंपाक घराचे आर्थिक नियोजन बिघडले. त्यामुळे महिन्याचे आर्थिक वेळापत्रक कोलमडले असून किराणा खरेदीबाबत तडजोड करावी लागली. - स्नेहल पाटील, गृहिणीएकीकडे सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असताना, स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद केल्याने आगीतून फुफाट्यात पडल्याची गत गृहिणींनी अनुभवली. त्यामुळे ग्रामीण भागात चूल पेटविण्याचे प्रमाणही वाढले आहे.        - करुणा खाटा, गृहिणी, बोर्डीमागील काही महिन्यांत झालेली भाववाढ आणि त्यानंतर केवळ १० रुपयांनी सिलिंडरच्या किमतीत केलेली घट नक्कीच दिलासादायक बाब नाही.    - अमरिता सुरती, गृहिणी, चिखले

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर