शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंग्रेकालीन सीमोल्लंघन परंपरेस रघुजी राजे आंग्रे यांनी दिला आधुनिक स्नेहाचा आयाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:01 IST

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची पंरपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरिया या आपल्या निवासस्थानी आजही अबाधित राखली आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची पंरपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरिया या आपल्या निवासस्थानी आजही अबाधित राखली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाकरिता मराठा बांधव सहकुटुंब विजया दशमीच्या संध्याकाळी घेरियामध्ये एकत्र येतात. गुरुवारी विजया दशमीच्या दिवशी संध्याकाळी रघुजीराजे आंग्रे व मराठा बांधवांतील ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव सीमोल्लंघनास निघाले होते. हिराकोट किल्ल्या शेजारून हिराकोट तलावावरून तलावाशेजारील आंग्रेकालीन राज राजेश्वरी देवीच्या मंदिरात देवीस अभिवादन करून आशीर्वाद घेतले. सर्वांना सुखसमृद्धी लाभण्याकरिता देवीस रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व मराठा बांधवांच्या वतीने गार्‍हाणे घालून आशीर्वाद मागितला. यावेळी आपटय़ाच्या पानांची विधिवत पूजा करून आई भवानीच्या आरतीनंतर मंदिरात सोने लुटण्यात आले.घेरियात सुवर्ण पुजनांती, सोने लुटून शुभेच्छाघेरियामध्ये परतल्यावर भगव्या ध्वजाच्या साक्षीने आपट्यांच्या पानांचे सोन लुटण्याकरिता सज्ज ठेवण्यात आले होते. त्याचेही रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून, सर्वांनी सोने लुटण्याचा आनंद घेतला. लुटलेले सोने एकमेकाला देत आलिंगनासह सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. मराठा भगिनींनी देखील एकमेकींना सोने देऊन अभिवादन केले.संघटित राहण्यासाठी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी सुरू केली परंपरासरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळात परिसरातील सर्वानी संघटित राहावे त्याकरिता एकत्र यावे या हेतूने सीमोल्लंघन व सोने लुटण्याची परंपरा सुरू झाली. आजच्या व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरच्या जमान्यात प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांची देवाणघेवाण कमी होत चालली आहे. आधुनिकता स्वीकारताना आपल्या प्राचीन परंपरा आणि त्यानिमित्ताने संघटित होणे ही देखील काळाची गरज असल्याने, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची सीमोलंघनाची परंपरा अबाधित राखून त्यास आधुनिक स्नेहाचा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसेंदिवस हा उपक्रम यशस्वी होते आहे, याचा आनंद वाटत असल्याची भावना या निमित्ताने रघुजीराजे आंग्रे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.