शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

म्हसळा शिवसेना रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 02:23 IST

म्हसळा तालुक्यासह श्रीवर्धन, दिघी, माणगाव या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे.

म्हसळा  - म्हसळा तालुक्यासह श्रीवर्धन, दिघी, माणगाव या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. अनेक महिने झाले तरीही हे खड्डे भरण्याचे काम संबंधित विभागाकडून करण्यात आलेले नाही, त्यामुळे प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. याबाबत संबंधित खात्याचे मंत्री व प्रशासनातील अधिकारी यांना अनेक वेळा लेखी निवेदने देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली होती.दिघी माणगाव रस्त्याची अवस्था बिकट असतानाही दिघी पोर्टची ओव्हर लोड अवजड वाहतूक चालू आहे. या मार्गावर बºयाच वेळा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत बेशिस्तपणे गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळतात, त्यामुळे या संपूर्ण परिसरातील जनतेत भयाचे सावट निर्माण झाले आहे. अनेक वेळा यांची प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत सर्व तक्र ारी प्रशासनाकडे वारंवार करूनसुद्धा कोणतीही ठोस कारवाई प्रशासन करीत नाही. त्यामुळे यातून हेच सिद्ध होते की प्रशासन मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे, त्याचबरोबर प्रशासन नक्की कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील प्रशासन दिघी पोर्टच्या मुजोर ट्रेलरचालकांवर कारवाई का करीत नाही, यामुळे दिघी-माणगाव रस्त्यावर प्रवास करणारे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर सर्व नियम धाब्यावर बसवून व पायदळी तुडवून भरदिवसाही ओव्हर लोड अवजड वाहतूक चालूच असते याचा तालुक्यातील नागरिकांनाच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या मुजोर ट्रेलरचालकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आणि प्रशासन नक्की कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे, हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या जबाबदारी खातर प्रशासनाविरोधात म्हसळा तालुक्यातील शिवसेना, अवजड वाहतूक सेना, युवासेना यांच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी सदर आंदोलनास माजी श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाध्यक्ष रवि मुंडे, म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख नंदू शिर्के तसेच युवा सेना पदाधिकारी यांच्यासहित तालुक्यातील इतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच केंद्रात व राज्यात शिवसेना जरी सत्तेत असली तरी जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवून जनतेसाठी आंदोलन करणार असून, वेळप्रसंगी स्वत:वर गुन्हे दाखल करून घेण्याची ही तयारी आहे, असे रवि मुंडे यांनी सांगितले.या वेळी तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांसह श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड, उपतालुकाप्रमुख अनंत कांबळे, वाहतूक सेनाअध्यक्ष श्याम कांबळे, युवासेना अधिकारी अमित महामुनकर, नितीन पेरवी, अमोल पेंढारी, सचिन महामुनकर, संतोष सुर्वे उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडShiv Senaशिवसेना