शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकारी मारहाण प्रकरणी आमदार लाड निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:03 IST

पालघर येथील उपजिल्हाधिकारी आणि रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणून नेमलेले अभय करगुटकर यांना कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी

कर्जत : पालघर येथील उपजिल्हाधिकारी आणि रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणून नेमलेले अभय करगुटकर यांना कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी मारहाण केल्याप्रकरणी कर्जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल २१ फेब्रुवारी लागला. न्यायालयाने आमदार सुरेश लाड यांची निर्दोष मुक्तता केली आहे.११ आॅगस्ट २०१६ रोजी रिलायन्स गॅस पाइपलाइनचे अधिकारी आणि शासनाने नियुक्त केलेले सक्षम प्राधिकारी अभय करगुटकर हे जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारातील खासगी कार्यालयात बसले होते. त्यांनी शेतकºयांच्या जमिनी कोणत्याही परवानगीविना घेण्याचा सपाटा लावला होता. अनेक शेतकºयांनी याबाबतच्या तक्र ारी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्याकडे केल्या होत्या, त्याची माहिती घेण्यासाठी आमदार सुरेश लाड त्या ठिकाणी गेले. मात्र, उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी लोकप्रतिनिधी आमदार लाड यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. आमदार लाड यांनी उपजिल्हाधिकारी व रिलायन्सच्या काही अधिकाºयांना मारहाण केली होती. त्याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर १७ आॅगस्ट रोजी रात्री अभय करगुटकर यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात आमदार सुरेश लाड यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. सरकारी अधिकाºयाला सरकारी कामापासून वंचित ठेवणे, लोकसेवकाला त्यांचे कर्तव्य पार पडण्यापासून परावृत्त करणे आणि अपहरण करणे तसेच मारहाण, धमकी करण्याचे आरोप लाड यांच्यावर ठेवण्यात आले होते. याबाबत कर्जत पोलिसांनी आ.लाड यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. यावर न्यायालयाने त्यांची बाजू समजून घेऊन आमदार लाड यांना २५ हजार रुपयांच्या सॉल्व्हन्सी जामिनावर मुक्तता केली होती.कर्जत न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश एम. व्ही. तोकले यांच्यासमोर खटला चालला. आमदार सुरेश लाड यांच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. या खटल्यात उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर, कर्जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, रिलायन्समध्ये काम करणारे निवृत्त तहसीलदार महेंद्र पाटील, रिलायन्सचे अधिकारी, पंच असे १४ साक्षीदार तपासले. दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खटल्याचे कामकाज दीड महिन्यात संपले.