शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवी यांच्या पीएची होणार चौकशी; रायगड लाच लुचपत विभागाची मालप यांना नोटीस

By राजेश भोस्तेकर | Updated: February 2, 2023 18:15 IST

ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे.

अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशी बाबत रायगड लाच लुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश नोटीस द्वारे मालप यांना देण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

रायगड लाच लुचपत विभागाने आमदार राजन साळवी आणि त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ते बाबत चौकशी सुरु केली आहे. २० जानेवारी रोजी आमदार साळवी यांची सहा तास अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात चौकशी झाली होती. यावेळी साळवी यांनी चौकशीला सहकार्य केले असून काही कागदपत्रांची मागणी विभागामार्फत मागितली आहे. ही माहिती दहा फेब्रुवारी आमदार साळवी यांना सादर करायची आहे. तत्पूर्वीच साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ते बाबत चौकशीला हजर राहण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस पाठवली होती. 

सुभाष मालप यांना २ फेब्रुवारी रोजी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहण्याबाबत नोटिसा द्वारे कळविण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. मालप यांनी कार्यालयात हजर राहणार की नाही याबाबत कळविण्यात आले नसल्याचे लाच लुचपत प्रशासनाने सांगितले. मात्र स्वीय यांनाही नोटीस पाठविण्यात आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगड