शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजन साळवी यांचे पीए चौकशीला हजर, रायगड लाच लुचपत विभागाची मालप यांना नोटीस

By राजेश भोस्तेकर | Updated: February 3, 2023 11:45 IST

ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे.

अलिबाग :

ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशी बाबत रायगड लाच लुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे. गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश नोटीस द्वारे मालप यांना देण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. नोटिस २ फेब्रुवारीला मिळाल्याने मालप उपस्थित राहू शकले नव्हते. शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी सुभाष मालप हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर झाले. यावेळी त्याच्या सोबत आमदार राजन साळवी हे सुध्दा आले असले तरी मालप हे एकटेच चौकशीला सामोरे गेले आहेत.

स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड लाच लुचपत विभागाने आमदार राजन साळवी आणि त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ते बाबत चौकशी सुरु केली आहे. २० जानेवारी रोजी आमदार साळवी यांची सहा तास अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात चौकशी झाली होती. यावेळी साळवी यांनी चौकशीला सहकार्य केले असून काही कागदपत्रांची मागणी विभागामार्फत मागितली आहे. ही माहिती दहा फेब्रुवारी आमदार साळवी यांना सादर करायची आहे. तत्पूर्वीच साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ते बाबत चौकशीला हजर राहण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस पाठवली होती. 

सुभाष मालप यांना २ फेब्रुवारी रोजी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहण्याबाबत नोटिसा द्वारे कळविण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. नोटीस २ फेब्रुवारी ला मिळाल्याने ते गैरहजेर राहिले होते. आज शुक्रवारी मालप हे लाच लुचपत कार्यालयात हजर झाले आहे. लाच लुचपत विभागामार्फत त्याच्याही मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. आमदार राजन साळवी यांची आणि त्याच्या कुटुंबाची मालमत्तेची चौकशी सुरू असताना स्विय सहाय्यक सुभाष मालप हे सुध्दा चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवी