शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

‘कोंढाणे’साठी आमदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:22 IST

रस्त्याची कामे अपूर्ण : कर्जत, खालापूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान

कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्यातील हायब्रिड अ‍ॅन्युटीमध्ये मंजूर झालेली व महापुरात वाहून गेलेल्या रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण व्हावीत तसेच कोंढाणे धरण सिडकोला न देता कर्जत तालुक्यासाठी करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आमदार सुरेश लाड यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार, २७ आॅगस्टपासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात आमदार लाड उपोषणाला बसणार आहेत.

खालापूर तालुक्यातील सावरोली खारपाडा व कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ या रस्त्याची कामे हायब्रिड अन्युटीमध्ये मंजूर होऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था बिकट असून याठिकाणाहून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे चालकांसह नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागते. मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे त्वरित व्हावीत, या मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आमदार लाड उपोषणाला बसले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला असून संबंधित बांधकाम विभागाने कामांमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.कर्जत, खालापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुर्दशा झाली असून भिवपुरी रोड, कडाव, कोंदिवडे, वदप या राज्यमार्गावरील व माले, चिकन पाडा या रस्त्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोंढाणे धरण प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. या धरणाच्या पाण्यावर येथील जनजीवन अवलंबून आहे. म्हणून सिडकोमार्फत नैना प्रकल्पाला या धरणाचे पाणी देण्यास विरोध असून हे कोंढाणे धरण कर्जतसाठीच व्हावे, तसेच रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत या मागणीसाठी लाड उपोषणास बसणार आहेत.आमदारांनी उपोषणाचा इशारा देताच ठेकेदाराला जाग आली आणि त्याने रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सोमवारी मशिनरी आणून त्वरित काम चालू करतो, असे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले. हायब्रिड अ‍ॅन्युटीअंतर्गत सुमारे १४२ कोटीचे काम पी. पी. खारपाटील अँड सन्स या कंपनीने घेतले आहे, मात्र ही कंपनी रस्त्याचे काम करण्यास चालढकलपणा करीत होती. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता.

कर्जत तालुक्यातील कर्जत - डोणे या २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यामधील डोणे ते वडवली या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता फक्त वडवली ते भिसेगाव फाटा या ९ किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. मात्र आमदार सुरेश लाड यांनी या रस्त्याबाबत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने ठेकेदार कामाला लागला आहे. मंगळवारपासून काँक्रीटचे काम सुरू करतो असे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे