मयूर तांबडे / पनवेलनोव्हेंबर महिना उजाडला की, ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. क्रिकेटमधून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत.आबालवृद्धांमध्ये या खेळाची प्रचंड क्रेझ आहे. यात महिलांची संख्याही मोठी आहे. सध्या पनवेल तालुक्यात क्रिकेट खेळण्यासाठी मैदाने तयार करण्याचे काम सुरू आहे. खेळाडू क्रिकेटची खेळपट्टी तयार करण्यात व्यस्त आहेत. पुढील काही दिवसांत ग्रामीण भागात लाखो रुपयांच्या क्रि केट स्पर्धा सुरू होणार असल्याने क्रिकेटच्या सरावाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सामन्यांसह रात्रीचे सामने देखील पनवेल तालुक्यात लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यातून खेळाडंूना व विजयी संघाला लाखोंची बक्षिसे दिली जातात. त्यामुळेच ग्रामीण भागातील सामन्यांना प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी मिळणार असल्याचे मत आयोजक व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातही अनेक चांगले खेळाडू असून त्यांना योग्य संधी मिळण्याची गरज आहे. अशा स्पर्धांमधूनच त्यांना पुढे जाण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. ग्रामीण क्रि केट सामन्यांचे थेट प्रक्षेपण टेनिस क्रि केट व वर्ल्ड टेनिस क्रि केटद्वारे यू ट्यूबवर केले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस ग्रामीण क्रि केटची लोकप्रियता वाढत चालली आहे. नावडे, पारगाव, दापोली, सावळे, दिघोडे, मुर्बी, अजनबी ओवळे, पेठ तळोजा हे प्रमुख संघ नाईट स्पर्धांचे विजयी संघ मानले जातात. नेरे, विहिघर, चिखले, तळोजा, पेंधर, कळंबोली, आकुर्ली, वलप, चिर्ले आदी गावात लाखो रु पयांची बक्षिसे असलेल्या क्रि केटच्या स्पर्धा भरविल्या जातात. जवळपास आठ फुटी उंच चषक स्पर्धेतील विजयी संघास दिले जातात. पुढच्या आठवड्यापासून सामन्यांना सुरु वात होणार आहे. काही सामन्यांमध्ये चीअर गर्ल देखील आणण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण सामन्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. सामन्यांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील आपली क्षमता सिद्ध करण्यास मिळत आहे.
ग्रामीण क्रिकेट स्पर्धांमधून कोट्यवधींची उलाढाल
By admin | Updated: November 15, 2016 04:46 IST