शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मायलेकींना सुवर्ण; गतवर्षीही ज्योतिका यांना पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 03:57 IST

दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय ज्युनिअर, मास्टर महिला व पुरु ष पॉवर लिफ्टिंग आणि खुली बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय ज्युनिअर, मास्टर महिला व पुरु ष पॉवर लिफ्टिंग आणि खुली बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या.महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द ठेवून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची चिकाटी बाळगणाºया गोरेगावच्या ४८ वयाच्या ज्योतिका जयंत पाटेकर व त्यांची तेरावीत शिकणारी कन्या वैभवी या दोघी मायलेकींनी स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. ज्योतिका पाटेकर यांनी ६३ किलो वजनी गटात २२५ किलो वजन उचलून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर त्यांची कन्या वैभवी हिने ५७ किलो वजनी गटात २३० किलो वजन उचलून प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला. याशिवाय गोरेगावमधील दिनेश गोरीवले याने ५२ किलो वजनी गटात ९५ किलो बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक मिळविले. तर सनी साळवी यांस चौथ्या क्र मांकावर समाधान मानावे लागले. ज्योतिका आणि वैभवी यांची १९ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान नागपूर येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.गतवर्षी याच हंगामातील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ज्योतिका पाटेकर यांनी सुवर्ण व रजत पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उंचावले होते. पाटेकर वयाच्या २७व्या वर्षांपासून जिम्नॅस्टिक खेळ प्रकारात कार्यरत होत्या. नव्वदीच्या दशकानंतर त्यांनी पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रस घेतला. त्यानंतर त्या पॉवर लिफ्टिंग प्रकारात स्वत:च्या मुलीचा व इतर हौशी स्पर्धकांचा सराव गोरेगावातील बाबासाहेब मराठे फिजिकल अ‍ॅकॅडमीत करून घेत आहेत.रायगडमधील मुलींना या पॉवर लिफ्टिंग क्र ीडा प्रकारात तयार करून अधिकाधिक स्पर्धेतून यश संपादन करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पाटेकरांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्याला मिळालेल्या सुवर्णपदकापेक्षा आपल्या मुलीला प्रथमच मिळालेल्या सुवर्णपदकाने खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. तर वैभवीने आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड