शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
5
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
6
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
7
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
8
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
9
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
10
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
12
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
13
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
14
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
15
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
16
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
17
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
18
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
19
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
20
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

मेट्रो ठरणार किफायतशीर

By admin | Updated: May 20, 2014 02:43 IST

मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्‍या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे.

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणार्‍या मेट्रो रेल्वेचे भाडे नक्की किती असणार, यावर चर्चा रंगली असतानाच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्‍या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे. मुंबई मेट्रो रुळावर येण्यासाठी आता केवळ रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. आणि ही मंजुरी पुढील काही दिवसांत कधीही मिळण्याची शक्यता मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने वर्तवली आहे. मात्र मेट्रोच्या भाड्याहून उफाळून आलेला वाद अद्याप शमलेला नाही. कारण राज्य सरकारने यावर अळीमिळी गुपचिळी साधली असून, लोकप्रतिनिधींनी मेट्रोच्या भाड्याच्या मुद्द्यांवर आवाज उठवत ब्र उच्चारला आहे. शिवाय मेट्रोचे भाडे कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोचे भाडे किमान प्रथमत: ठरविण्याचा अधिकार हा मेट्रो रेल्वे प्रशासनाला आहे. आणि सध्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रशासन आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या शहर विकास विभागाला धाडलेल्या पत्रात हा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. मेट्रोचे भाडे ठरविण्यासाठीच्या समितीवर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि राज्य व केंद्र सरकारचा अधिकारी यांचाही समावेश असणार आहे. शिवाय मेट्रोचे भाडे ठरविताना डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) याचाही प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती एमएमओपीएलच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)