शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पारा १८ अंशांवर; हुडहुडी भरलेले जिल्हावासीय शोधताहेत शेकोटीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:17 IST

दिवसाही वातावरण थंड असल्याने उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे रायगडकर सध्या गारव्याचा आस्वाद घेत आहेत.

अलिबाग : राज्यात तापमानाचा पारा घसरला असल्याने गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातही तापमानाचा पारा हा १८ अंशांवर आल्याने रायगडकरांना हुडहुडी भरली आहे. दिवसाही वातावरण थंड असल्याने उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे रायगडकर सध्या गारव्याचा आस्वाद घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा वाढल्याने रायगडकर थंडीने कुडकुडत आहेत. हवेत गार वारा वाहत असल्याने जिल्ह्यातील वातावरण गारेगार झाले आहे. त्यामुळे दिवसरात्र रायगडकर हे उबदार कपडे घालून थंडीपासून बचाव करीत आहेत. रात्रीच्या सुमारास थंडीचा कडाका वाढत असल्याने ठिकठिकाणी शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेताना दिसत आहेत. सायंकाळनंतर पारा घसरत आहे. जिल्ह्यात कमाल तापमान हे २८, तर पहाटेच्या सुमारास पारा १८ ते १९ अंशांवर उतरत आहे. त्यामुळे रायगडकरांसह जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटक थंडीचा आस्वाद घेत आहेत.

चार दिवसांपासून जोर वाढलाडिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली होती; मात्र दिवसभर वातावरण गरम असले, तरी सायंकाळनंतर थंडी पडण्यास सुरुवात होत होती. त्यामुळे थंडीचा काही प्रमाणात आस्वाद रायगडकर घेत होते. जानेवारीत या थंडीचा आस्वाद घेत असताना दुसऱ्या आठवड्यात थंडी गायब होऊन अवेळी पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे ऊन, पाऊस आणि काहीशी थंडी असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थंडी गायब होऊन उकाडा सुरू झाला होता; मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील पारा हा उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उबदार कपडे दिवसभर घालण्याची वेळ रायगडकरांवर आली आहे.

गारवा कायम राहणार    चार दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात थंडावा जाणवत आहे. सायंकाळनंतर तर पारा खाली घसरतो.     थंडी अधिक पडली असल्याने दिवसाही शेकोट्या पेटवून थंडी घालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात तर हुडहुडी भरत असल्याने शेकोट्या पेटलेल्या दिसतात.     त्यामुळे रायगडकर सध्या पडलेल्या थंडीचा चांगलाच आस्वाद घेत आहेत. वातावरणात गारवा हा काही दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Raigadरायगड