शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

खासदारांनी घेतले सदस्यांना फैलावर

By admin | Updated: November 7, 2015 23:23 IST

तासगाव पालिका : एकसंध राहण्याची ताकीद

- नामदेव मोरे, नवी मुंबईरायगड जिल्ह्यातील खाडीकिनाऱ्याच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या मॅनग्रोव्हज्चे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल १३६३ हेक्टरवर मॅनग्रोव्हज् असले तरी अद्याप अधिकृत वन घोषीत केलेले नाही. पनवेल, उरण सह पूर्ण जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली ही वनस्पतीच नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेळेतच वृक्षतोड थांबविली नाही तर सुनामी व मोठ्या वादळामध्ये समुद्राचे पाणी शहरांमध्ये जाऊन प्रचंड जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुर्ण कोकणामधील मॅनग्रोव्हज्च्या रक्षणासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. सामाजीक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईमध्ये १७७५ हेक्टर मॅनग्रोव्हज्चे जंगल घोषीत केले आहे. प्रत्येक ठिकाणी वनविभागाने बोर्ड लावून शहराची कवचकुंडले असणाऱ्या व खाडीकिनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या या वृक्षांची कत्तल केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे नंबरही देण्यात आले आहेत. याशिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतर सिडकोेने वितरीत केलेल्या भुखंडावरील विकासकामेही थांबविण्यात आली आहेत. दक्ष नागरिकांमुळे मॅनग्रोव्हज्चे रक्षण होण्यास सुरवात झाली आहे. परंतू रायगड जिल्ह्यात जवळपास १३६३ हेक्टर जमीनीवर मॅनग्रोव्हज् आहे. पनवेल, उरण, पेण, अलीबाग, श्रिवर्धन, रोह्याचा काही भाग व इतर ठिकाणी खाडीकिनारा असून मॅनग्रोव्हज्ची जंगल आहे. परंतू शासनाने अद्याप हा परिसराला अधिकृतपणे जंगल म्हणून घोषीत केलेले नाही. नवी मुंबईपासून पेण पर्यंत खाडीकिनाऱ्यांजवळ इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इतर विकास कामेही केली जात आहेत. या विकासासाठी मॅनग्रोव्हज्ची खुलेआम कत्तल सुरू आहे. दिवसेंदिवस मॅनग्रोव्हज्चे जंगल नाहीसे होत आहे. पर्यावरणामुळे खाडी किनाऱ्याचे रक्षण होते. किनाऱ्याची धुप कमी होते. याशिवाय भरती व वादळाच्या दरम्यान समुद्राचे पाणी शहरांमध्ये किंवा खाडीकिनाऱ्याच्या शेतीमध्ये जाण्यापासून बचाव होत असतो. रायगड जिल्ह्यामध्येही शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. उरण व पनवेल तालुका नवी मुंबई व मुंबईचा अविभाज्य भाग झाला आहे. याशिवाय नेरळ ते पेण पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. सिडकोने नयना क्षेत्रातील २७० गावांमधील जमीनीचा विकास करण्याचे काम सुरू आहे. विकासाबरोबर प्रदुषणामध्येही वाढ होत आहे. मॅनग्रोव्हज् वाचविण्यासाठी चळवळखाडी किनाऱ्याजवळील मॅनग्रोव्हज्चे जंगल वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. शासन व वनविभागही उदासीन असल्यामुळे खुलेआम वृक्षतोड सुरू आहे. नवी मुंबईमध्ये सेव्ह मॅनग्रोव्हज् नवी मुंबई एक्झीस्टंस या संस्थेच्या पाठपुराव्यानंतर या परिसरात वन घोषीत केले असून तारेचे कुंपणही घातले आहे. रायगड जिल्ह्यामध्येही जंगल वाचविण्यासाठी चळवळ सुरू करण्याची आवश्यकता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यात १३६३ हेक्टर मॅनग्रोव्हज् असून वर्षाला जवळपास ५४५२ टन कार्बन वेगळा करण्याची क्षमता आहे. परंतु शासनाने अद्याप वन घोषीत करण्यात आले नसून त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्याप्रमाणात गैरफायदा घेऊन वृक्षतोड सुरू आहे. सामाजीक कार्यकर्त्यांनी मॅनग्रोव्हज्चे वन घोषीत करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबईमध्ये १७४५ हेक्टरवर मॅनग्रोव्हज् असून त्यामुळे प्रतिवर्षी ७४६७ मेट्रीक टन कार्बन वेगळा केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्र व खाडीकिनारी जवळपास १३६३ किलोमीटरवर मॅनग्रोव्हज् आहे. परंतु अद्याप शासनाने कांदळवनाची घोषणा केलेली नाही. संरक्षणासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा करूनही अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्यामुळे आता न्यायालयात धाव घेतली जाणार आहे. - सुकुमार किल्लेदार, अध्यक्ष, सेव्ह मॅनग्रोव्हज अँड नवी मुंबई