शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 04:49 IST

सनियंत्रण समितीची शनिवारी बैठक: तक्रारींसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

अलिबाग : माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन सनियंत्रण समितीची बैठक शनिवार दि. १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या क्षेत्रात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव, तसेच या समितीकडे करावयाच्या तक्र ारींसाठी नागरिकांनी आपले अर्ज या समितीचे सदस्य सचिव तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे तत्काळ सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकान्वये सेवानिवृत्त भा. प्र. से. अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ९ सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षांकरिता गठीत करण्यात आली असून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीची आठवी बैठक येत्या शनिवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वा. माथेरान नगरपरिषदेचे सभागृह, माथेरान, ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि. ४ फेब्रुवारी २००३ च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण ८९ (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पूर्ण १व भागत: १९ अशी एकूण- २०,खालापूर तालुक्यातील भागत: १०,पनवेल तालुक्यातील पूर्ण २ व भागत: ३८ अशी एकूण- ४0,आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील भागत: १९अशा एकूण ८९ गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. वरील समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसीलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे. या गावामधील जो भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, त्या क्षेत्रातील कोणतीही विकासकामे सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेखेरीज करता येणार नाहीत.मान्यतेच्या दृष्टीने १० प्रतीत प्रस्ताव अपेक्षितया संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकासविषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नूतनीकरण, संवेदनशील क्षेत्रात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्र ी. या कामांना सनियंत्रण समितीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या संदर्भात या समितीकडे कोणास काही तक्र ारी करावयाच्या असतील तर त्यांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे सुपूर्द करावेत. तसेच विकासकामांसाठी सनियंत्रण समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव १० प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती यांच्याकडे तत्काळ सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनीकेले आहे. 

टॅग्स :MatheranमाथेरानEco Proइको-प्रोalibaugअलिबाग