शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानकर त्रस्त : मिनीबस सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:16 IST

दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे.

माथेरान : दहा वर्षांपूर्वी अनेक संघर्षानंतर कर्जत-माथेरान ही मिनीबस सेवा शासनाने सुरू केली खरी, पण आजही या मार्गावर दोन नवीन बसेस उपलब्ध असताना सुद्धा कर्जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे या सेवेचा दिवसेंदिवस बोजवारा उडाला आहे.आॅक्टोबर २००८ मध्ये ही सेवा सुरू करताना स्थानिकांना नेहमीप्रमाणेच आपल्याच स्वत:च्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागला होता. या मार्गावर कर्जत आगाराला याच बससेवेच्या माध्यमातून भरीव उत्पन्न सुद्धा मिळत आहे. मागील वर्षी दोन नवीन बसेस कर्जत आगाराला देण्यात आलेल्या असताना यातील एक बस कर्जत-पनवेल अशा फेºया करीत आहे. त्यामुळे एकच बस कर्जत- माथेरान दरम्यान धावत असते. अनेकदा ही बस बंद पडत असल्याने याचा नाहक त्रास नियमितपणे कॉलेजला जाणाºया पासधारक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच रोज प्रवास करणाºया व्यापारी वर्गाला सोसावा लागत आहे. या बसेस केव्हाही वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बसची वाट पहात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत असल्याने मानसिक त्रास प्रवाशांना होत आहे. वेळप्रसंगी वाढीव रक्कम मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.अनेकदा बस येणार आहे की नाही याबाबत कर्जत आगाराला फोनवरून विचारणा केल्यास फोन बंद असतो. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच नेरळ येथील खांडा येथे बस आणली जात नाही. बस नेरळ -कल्याण हायवेवर उभी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना नेरळ स्टेशन पासून एक ते दीड किलोमीटर पायपीट आपल्या सामानासह लहान मुलांना घेऊन करावी लागत आहे. माथेरानपासून दस्तुरीपर्यंतचे तीन किलोमीटर अंतर आणि नेरळ येथून सुद्धा बससाठी पायपीट यामध्ये वयोवृद्ध नागरिकांना अत्यंत जिकिरीचे बनलेले आहे. याकामी बस स्टॅण्ड हा नेरळ बस डेपो येथे केल्यास सर्वांनाच सोयीस्कर होणार आहे. शासन याकडे केव्हा गांभीर्याने बघणार असा संतप्त सवाल वयोवृद्ध नागरिक करीत आहेत.एकच बस धावतेमागील वर्षी दोन नवीन बसेस कर्जत आगाराला देण्यात आलेल्या असताना यातील एक बस कर्जत-पनवेल अशा फेºया करीत आहे. त्यामुळे एकच बस कर्जत-माथेरान दरम्यान धावत असते.या बसेस केव्हाही वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बसची वाट पहात प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत असल्याने मानसिक त्रास प्रवाशांना होत आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान