शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान शटलच्या सात फे-या करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:05 IST

अमनलॉज ते माथेरान स्थानकापर्यंत शटल सेवेच्या फेºया वाढविण्यात याव्यात, अशी माथेरानकरांची सातत्याने मागणी होत असल्याने यापुढे शटलच्या पाचऐवजी सा

माथेरान : अमनलॉज ते माथेरान स्थानकापर्यंत शटल सेवेच्या फेºया वाढविण्यात याव्यात, अशी माथेरानकरांची सातत्याने मागणी होत असल्याने यापुढे शटलच्या पाचऐवजी सात फेºया करण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. जैन यांनी माथेरानकरांना दिले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.माथेरानकरिता सध्या अमनलॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवेच्या माध्यमातून केवळ पाच फेºया होत आहेत. त्यामुळे काहीअंशी का होईना, येथील पर्यटन व्यवसायाला गती प्राप्त झाली असली, तरीसुद्धा या शटलच्या मर्यादित फेºया असल्याने अनेक पर्यटकांना या गाडीचा आनंद उपभोगता येत नाही. २१ फे ब्रुवारीला रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. जैन यांनी माथेरानला धावती भेट दिली. या वेळी त्यांना माजी नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेविका प्रतिभा घावरे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी लेखी निवेदन देऊन रेल्वेच्या बाबतीत असलेल्या समस्या सांगितल्या. त्यानुसार अमनलॉज ते माथेरान दरम्यान यापुढे सात फेºया करण्यात येतील, असे जैन यांनी आश्वासन दिले.जैन यांना रेल्वेस्थानकातील पर्यटकांना भेडसावत असलेल्या अडचणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे, नितीन सावंत यांनी निदर्शनास आणून दिल्या. तर या शटलमध्ये पासधारकांना ऐन गर्दीच्या वेळी पायपीट करावी लागत आहे. याबाबत ठोस उपाययोजना करावी, असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी जैन यांना सूचित केले. तर फलाट क्र मांक दोन वरील रेल्वे स्थानकाच्या आवरातील पडक्या इमारतीच्या जागेवर एखादे म्युझियम सुरू केल्यास पर्यटकांची संख्यासुद्धा निश्चितपणे वाढेल, असे माजी नगरसेवक संतोष पवार यांनी नमूद केले. शटलच्या सात फेºया करण्याच्या जैन यांच्या सकारात्मक निर्णयाचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी स्वागत केले. या वेळी माजी नगरसेवक दयानंद डोइफोडे, प्रदीप घावरे आदी उपस्थित होते.