शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

माथेरान मिनीट्रेनची शटल सेवा सुरू, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 00:20 IST

Matheran : लॉकडाऊनमध्ये ही ट्रेन जवळपास आठ महिने बंद करण्यात आली होती. त्यामुळे नुकताच २ सप्टेंबरपासून माथेरान अनलॉक केल्याने इथे पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे.

माथेरान : माथेरानकरांसह पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सेवा आजपासून, दि. ४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिल्याच दिवशी या फेरीत १७ प्रौढ, तर ७ मुले अशा एकूण चोवीस पर्यटकांनी प्रवास केला आहे. सध्या या मार्गावर शटलच्या दोन फेऱ्या होणार असून, माथेरान स्टेशनमधून सकाळी ०९-३० आणि संध्याकाळी ०४-०० वाजता सुटेल, तर अमन लॉज स्टेशनवरून सकाळी ०९-५५ आणि संध्याकाळी ०४-२५ वाजता सुटणार आहे. जरी शटलच्या दोन फेऱ्या कार्यान्वित असल्या, तरी आगामी सुट्ट्यांच्या हंगामात नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या मागणीनुसार या फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे, असे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून समजले आहे.लॉकडाऊनमध्ये ही ट्रेन जवळपास आठ महिने बंद करण्यात आली होती. त्यामुळे नुकताच २ सप्टेंबरपासून माथेरान अनलॉक केल्याने इथे पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. दस्तुरीपासून गावात येण्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागत होती. या कामी निदान मिनीट्रेनची अमन लॉज ते माथेरान स्टेशनदरम्यान शटल सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी स्थानिकांमधून सातत्याने पुढे येत होती. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन दि.४ नोव्हेंबरपासून शटल सेवा सुरू करण्यात आली आहे.

जवळजवळ सात ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनाला चालना प्राप्त होऊन इथले पर्यटन बहरणार आहे. या ट्रेनमुळे स्थानिकांसह पर्यटकांना लाभ मिळणार असून, ही सेवा अविरतपणे सुरू राहावी, यासाठी रेल्वेच्या संबंधित अधिकारी, तसेच कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत.- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

आज पहिल्यांदाच आम्ही या ट्रेनमधून प्रवास केला आहे. यापूर्वीही आम्ही

माथेरान मिनीट्रेनची शटल सेवा सुरू , पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण 

आज पहिल्यांदाच आम्ही या ट्रेनमधून प्रवास केला आहे. यापूर्वीही आम्ही नेहमीच इथे आवर्जून भेट देत होतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाने या सफरीचा मनमुराद आनंद घेतला आहे. आमच्या वेळेची बचत, तसेच दस्तुरीपासून जो काही अवाढव्य वाहतुकीसाठी खर्च होणार होता, त्याचीही बचत झाली आहे. ट्रेन सुरू झाली, यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत.- मोहसीन शेख, पर्यटक, मुंबई 

नेहमीच इथे आवर्जून भेट देत होतो. आमच्या संपूर्ण कुटुंबाने या सफरीचा मनमुराद आनंद घेतला आहे. आमच्या वेळेची बचत, तसेच दस्तुरीपासून जो काही अवाढव्य वाहतुकीसाठी खर्च होणार होता, त्याचीही बचत झाली आहे. ट्रेन सुरू झाली, यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत.- मोहसीन शेख, पर्यटक, मुंबई

टॅग्स :Matheranमाथेरान