शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान मिनीट्रेन बंदमुळे पर्यटकांचे हाल

By admin | Updated: June 12, 2016 00:59 IST

माथेरान मिनीट्रेनचे डबे मे महिन्यात दोनदा घसरल्याने ही सेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन सुटीच्या हंगामात ही सेवा बंद झाल्याने पर्यटकांना

माथेरान : माथेरान मिनीट्रेनचे डबे मे महिन्यात दोनदा घसरल्याने ही सेवा काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन सुटीच्या हंगामात ही सेवा बंद झाल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शिवाय स्थानिक व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसला. मिनीट्रेनची सेवा पूर्ववत व्हावी, यासाठी स्थानिक राजकीय मंडळींनी सलग दोन वेळा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. याकामी रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार दोनदा मार्गाची चाचणी घेण्यात आली आहे. तेव्हा मार्ग सुरळीत असल्याचे रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु अद्याप ही सेवा सुरू केलेली नसल्याने पर्यटकांची पायपीट मात्र सुरूच आहे. आॅक्टोबर १५ ते जून १५ या आठ महिन्यांत रेल्वेसेवा सुरू असते, तर पावसाळ्यात चार महिने गाडीला विश्रांती असते. तीन वर्षांपासून अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. शटलच्या माध्यमातून अवघ्या अडीच कि.मी.साठी घाट सेक्शन नसताना देखील प्रति प्रवासी ५० रु पये तर नेरळ-माथेरान या २१ कि.मी.साठी ६५० रु पये इतका दर आकारला जात आहे. भरीव उत्पन्न मिळून सुद्धा ही गाडी तोट्यात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे याबाबत लवकरच तोडगा काढण्याची मागणी होत आहे.