शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या तरुणाची अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:12 IST

मित्रासोबत मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी महाबळेश्वर येथे जात असताना, त्याचे गाडीतून अपहरण करून त्याला जबर मारहाण करत, सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली.

माथेरान : माथेरानचा तरुण योगेश गोरे आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून बहिणीच्या घरी महाबळेश्वर येथे जात असताना, त्याचे गाडीतून अपहरण करून त्याला जबर मारहाण करत, सातारा महामार्गावर टाकल्याची घटना घडली. या घटनेत योगेश याचा मृत्यू झाला आहे.माथेरानचा तरु ण योगेश गोरे हा आपला मित्र अक्षय परब याच्यासोबत मोटारसायकलवरून महाबळेश्वरच्या दिशेने जात असताना, याच दरम्यान १४ नोव्हेंबर रोजी भोरजवळ त्याची दुचाकी एका गाडीला घासली, यामुळे त्या गाडीतील लोकांबरोबर त्यांचा वाद झाला. नुकसानभरपाई म्हणून १० हजार रुपये देण्याची त्याच्याकडे मागणी करण्यात अली. या दरम्यान, त्याने त्याचे मेव्हणे सखाराम ढेबे यांना फोन करून घडलेली सर्व घटना सांगितली.त्यावेळी त्यांनीदेखील नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शविली आणि त्या गाडीतील लोकांना सातारा येथील गॅरेजमध्ये येण्याचे सांगितले. योगेश गोरे याला बलेरो गाडीत बसविण्यात आले. काही अंतर पुढे गेल्यावर योगेश त्याच्या मित्राला रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. या वेळी योगेशला त्याच्या मित्राने स्थानिकांच्या मदतीने तत्काळ १०८ रु ग्णवाहिकेने साताºयाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना भुर्इंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.या वेळी योगेशची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असणाºया योगेशचा १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा.च्या सुमारास पुणे येथील रु ग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला.शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, डोक्यात जबर दुखापतीतून मृत झाल्याचे स्पष्ट झाले असून, या घटनेची नोंद बिबवेवाडी, कात्रज, पुणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.या दरम्यान, योगेशचे मेव्हणे सखाराम ढेबे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणामधून घटनेची उकल आणि ज्या गाडीशी संबंधित ही घटना घडली, त्या गाडीचा क्र मांक एमएच १० सीजे ९८१३ हा समजला आहे.

टॅग्स :MurderखूनMatheranमाथेरान