शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये भेडसावत आहेत वाहतुकीचे प्रश्न, वीकेंडला पर्यटकांची गर्दी, गाड्या पार्क करायला जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 00:26 IST

Matheran : एमएमआरडीएच्या निधीतून माथेरान प्रवेशद्वार येथे सुसज्ज वाहनस्थळ उभारण्यात येत आहे, पण ही जागा वाहनस्थळासाठी अपुरी पडत आहे.

माथेरान: माथेरान हे मुंबई पुण्यापासून सर्वात जवळचे पर्यटनस्थळ आहे त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. सध्या लॉकडाऊनमुळे येथे बहुतेक पर्यटक स्वतःचे वाहन घेऊनच येत आहेत, त्यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.माथेरानकरिता नेरळहून एकमेव मार्ग उपलब्ध आहे. वीकेंडला माथेरानमध्ये गर्दी असते व अशा वेळी येथील प्रवेशद्वारावर येणाऱ्या पर्यटकांना गाड्यांच्या गर्दीतून वाट काढण्यास दोन तास लागत आहेत. एमएमआरडीएच्या निधीतून माथेरान प्रवेशद्वार येथे सुसज्ज वाहनस्थळ उभारण्यात येत आहे, पण ही जागा वाहनस्थळासाठी अपुरी पडत आहे. या वाहनस्थळाला लागूनच माथेरान नगरपालिकेचा भूखंड क्र.९३ हा वाहनस्थळासाठी उपलब्ध आहे व येथे पार्किंगची सोय झाल्यास माथेरानमध्ये येणाऱ्या गाड्यांचा वाहनस्थळाचा कायमचा प्रश्न मिटणार आहे, पण हा भूखंड परवानग्याच्या फेऱ्यात अडकला आहे, पण तोपर्यंत या जागेवर अनेक घोडेवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे व त्यांना बाहेर काढून पालिका हा भूखंड ताब्यात घेण्यास अपयशी ठरताना दिसत असल्याचे चित्र आहे. या भूखंडावर पार्किंगची सोय उपलब्ध झाल्यास माथेरानचा फार मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. वीकेंडला नेरळ माथेरान घाटामध्ये लांबच्या लांब रांगा लागत असल्याने अनेक वेळा पर्यटकांशी बाचाबाचीचे प्रसंग घडताना दिसत आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामामुळे वाहनकोंडीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. नेरळ-माथेरान मिनिट्रेन सुरू झाल्यास त्याचा फायदा या रस्त्यावर होणाऱ्या वाहनकोंडी कमी होण्यास होणार आहे, पण रेल्वे प्रशासन नेरळ माथेरान मिनिट्रेन सुरू करण्याच्या मनस्थितीत नसल्याचेच दिसत आहे, अपुरी इंजिने असल्याचे कारण सुरुवातीस दाखविले जात होते, नंतर रेल्वे लाइन सुरक्षिततेचे कारण पुढे केले गेले, पण ही सेवा सुरू असणे हे माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. मिनिबसच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यास काही प्रमाणात वाहनकोंडीपासून सुटका होऊ शकते. त्यामुळे निदान वीकेंडला तरी या बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान