शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:36 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी ५० टक्क्यांवर रखडलेल्या भात लावण्यांना चांगलाच वेग आला असून रविवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत १०० टक्के भात लावण्या पूर्ण होतील आणि बुधवारी १९ जुलै रोजी उंदीर या आपल्या वाहनावरून येणाऱ्या पुष्य नक्षत्राचा मध्यम स्वरूपाचा पाऊस भात लावण्यांना पोषक ठरू शकेल असा अंदाज शेतकरी बाळकृष्ण जोशी यांनी व्यक्त केला आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १३० मि.मी. पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. महाड १२९, पेण १२५.३०, माणगाव १११,तळा १०१,पोलादपूर ९५, श्रीवर्धन ९०, सुधागड ७९, मुरुड ७२, खालापूर ७०,रोहा ६९, अलिबाग ६७,पनवेल ४९.८०, उरण ४७, कर्जत ४२.६० आणि गिरिस्थान माथेरान येथे ८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांतील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८७.९२ मिमी आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी नियंत्रणात होती, मात्र जलप्रवाहात वाढ झाली आहे. वीजनिर्मितीत महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ६९ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जून २०१७ पासून येथे एकूण २१४५.६०मिमी पाऊस झाल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. धरणाची संकल्पित जलसंचय क्षमता ९.०९० दलघमी असून सद्यस्थितीत जलसंचय ४.७५५ दलघमी झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता धरणातील जलपातळी ९४.६५ मीटर होती. धरणातील जलपातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता रविवारी ०.४११९ दलघमीचा जलविसर्ग सोडण्यात आला तर यंदाच्या पावसाळ््यात आतापर्यंत १९.४६२३ दलघमीचा जलविसर्ग सोडण्यात आला. सद्यस्थितीत धरणाचे तीनही दरवाजे बंद असल्याची माहिती कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.२८ लघुपाटबंधारे धरणांपैकी २० धरणे १०० टक्के भरली जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी २० धरणे १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरली असून वाहू लागली आहेत. पूर्ण क्षमतेने भरलेल्या या २० धरणांमध्ये फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), सुधागड तालुक्यात कोंडगाव, घोटवड, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी (श्रीवर्धन), म्हसळा तालुक्यात पाभरे व संदेरी, महाड तालुक्यात वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे, खालापूर तालुक्यात भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवट, पनवेल तालुक्यातील मोरबे व उसरण यांचा समावेश आहे. उर्वरित आठ धरणांमध्ये अंबेघर (पेण) ३२ टक्के, श्रीगाव (अलिबाग) ३० टक्के, कार्ले (श्रीवर्धन) ४४ टक्के, रानिवली (श्रीवर्धन) ३६ टक्के, साळोख (कर्जत) ५३ टक्के, अवसरे (कर्जत) ८६ टक्के, बामणोली (पनवेल) ६८ टक्के, पुनाडे (उरण) ५५ टक्के भरली आहेत.