शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये भीषण स्फोट, ११ बेपत्ता; पाच कामगार जखमी, एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 08:39 IST

औषधांच्या कारखान्यातील दुर्घटना, पाच कामगार जखमी, एक गंभीर

सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्कमहाड : महाडच्या औद्योगिक क्षेत्रातील ब्लू जेट हेल्थ केअर लिमिटेड या औषधनिर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ११ कामगार बेपत्ता झाले असून, पाच कामगार जखमी झाले आहेत. स्फोटात कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला. बेपत्ता कामगारांच्या शोधासाठी पुण्याहून ‘एनडीआरएफ’चे पथक बोलावण्यात आले आहे. ते रात्री दाखल झाल्यानंतर शोधकार्य पुन्हा सुरू होणार होते. 

अंजनेय बायोटेक हा प्रकल्प येथे होता. तो दोन वर्षे बंद होता. तेथे नव्याने ब्लू जेट नावाने कारखाना सुरू होत असून, त्याच प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू होते. ते करीत असतानाच सकाळी १० च्या सुमारास एका रिॲक्टरमध्ये स्फोट झाला आणि त्यातील ज्वलनशील रसायन सर्वत्र पसरले. त्यामुळे आणखी काही रिॲक्टर फुटले आणि मोठमोठे स्फोट होत आग पसरत गेली. स्फोट होताच कामगार सैरावैरा पळत सुटले. त्यातील काही भाजले होते. त्यांनी शेजारच्या विरल, झुआरी आणि ॲक्वा फार्म या कंपनीत आश्रय घेतला. ज्या प्लांटला आग लागली त्याशेजारीच विरल कंपनीचा प्लांट असल्याने तेथील कामगारांनी फोमच्या साह्याने आग विझविण्यास सुरुवात केली. अन्य कंपन्यांतूनही फोम आणून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू झाले; मात्र आग आटोक्यात आली नाही. 

या दुर्घटनेत विक्रम डेरे, निमाई मुरमक, मयूर निंबाळकर, राहुल गिरासे, स्वप्नील आंब्रे हे कामगार जखमी झाले; तर अभिमन्यू, जीवन कुमार, विकास महतो, संजय पवार, शेषराव भुसाने, अक्षय सुतार, सोमनाथ वायदंडे, विशाल कोळी, आदित्य मोरे, अस्लम शेख, सतीश साळुंखे हे ११ जण बेपत्ता आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.

टॅग्स :mahad-acमहाडBlastस्फोट