शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मर्क्स कंपनीतील कामगारांचा टाळेबंदीविरोधात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:00 IST

कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली.

उरण  - कामगारांवरील हल्ल्यांचे प्रकार, कामगारांची वारंवार होणारी आंदोलने या प्रकारामुळे एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच टाळेबंदी घोषित केली. त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट येऊन कोसळले आहे. टाळे ठोकलेल्या गेटसमोरच कामगारांनी शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात सहभागी झालेल्या हैसा पाटील या पन्नास वर्षीय महिलेने यावेळी आपली व्यथा मांडली. मागील २५ वर्षांपासून कंपनीमुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितो. मात्र राजकीय नेत्यांच्या चिथावणीमुळे कामगारांवर हल्ले झाले. आमची शेती नाही, पतीची बायपास सर्जरी झालेली आहे. आता औषध पाण्याचा आणि कुटुंबाचा खर्च यापुढे कसा भागविणार, अशी भावनिक प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.द्रोणागिरी नोडमधील २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एमपीएम (मर्क्स) या कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून टाळेबंदी जाहीर केली आहे. कंपनीतील कामगार, अधिकाऱ्यांना काही महिन्यांपासून हिंसक कारवाई आणि धमक्या, मारहाणीला सामोरे जावे लागत आहे. सातत्याने होणारे जीवघेणे हल्ल्यामुळे काम करणाºया अधिकारी, कामगारांचे जीव धोक्यात आले. भय, तणाव या परिस्थितीत काम सुरू ठेवणे अशक्य असल्याने कंपनीपुढे टाळेबंदीचाच एकमेव पर्याय असल्याचे कारण पुढे करीत एपीएम (मर्क्स) कंपनीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून टाळेबंदी जाहीर केली आहे. कंपनीच्या टाळेबंदीच्या निर्णयामुळे या कंपनीत काम करणाºया ४०० कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. बेरोजगार होऊ पाहणाºया एपीएम कंपनीच्या कामगारांनी शुक्रवारपासूनच गेटसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केला आहे. या कंपनीमध्ये सफाईचे काम करणाºया महिलांचाही समावेश आहे.मागील २५ वर्षांपासून काम करणाºया महिला कामगारांवर टाळेबंदीमुळे उपासमारीचे संकट आल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाह कसा होणार या चिंतेने कामगारांबरोबरच महिलांनाही ग्रासले आहे. टाळेबंदीमुळे कंपनीने एपीएमच्या गेटलाच टाळे ठोकले आहे. कंपनीने निर्णय न बदलल्यास ४ आॅक्टोबर रोजी कामगारांच्या कुटुंबीयांसह उरण तहसीलवर मोर्चा काढणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या