शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी रोह्यातील बाजारपेठ सजल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 23:22 IST

मंदीचे सावट : आकाशकंदील, रांगोळी, विविध प्रकारच्या वस्तूंनी सजली दुकाने

रोहा : दोन दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने आकाशकंदील, रांगोळी आदी विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बहरलेली आहेत. परिणामी, रोह्यातील बाजारपेठ आता सजल्या असून भरगच्च भरलेल्या मालाने रात्रीच्या रोषणाईत खरेदीदारांना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहेत.

दिवे, रोषणाई, फटाके नागरिक दिवाळी सणानिमित्त आवर्जून खरेदी करत असतात. बहीणभावाचे नाते अधिक घट्ट करणारा दिवाळीतील भाऊबीज हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या वस्तू भेट देण्याची प्रथा आजही कायम आहे. या विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बाजारपेठ सजल्या असल्या तरी आर्थिक मंदीचे सावट मात्र आजही कायम आहे, त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत.

रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातून खास खरेदीसाठी रोहा शहरात येत असतात. जवळच धाटाव एमआयडीसी असल्याने व कंपनीत जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असल्याने आता निवडणुका संपल्याने खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक व महिला खरेदीसाठी बाहेर पडतील, अशा आशेवर व्यापारी आहेत.

यंदाही लाखो रुपयांच्या मालाची खरेदी करून आम्ही दुकानात माल भरलेला आहे. मात्र, निवडणुका होऊनही गिºहाइकांनी दीपावलीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. आर्थिक मंदीचा फटका बसल्याचेही काही प्रमाणात जाणवत आहे.- नारायण कान्हेकर, व्यापारी

आर्थिक मंदीच्या झळा अजूनही कायम आहेत. खिशात पैसेच आले नाही तर खरेदी कुठून करणार. आम्हीही लॉण्ड्री व्यावसायिक असून पहिल्यासारखे गिºहाईक येत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे पैसा येत नसेल तर दिवाळी असून ही खरेदी कशी करणार?- नंदकुमार राक्षे

टॅग्स :Diwaliदिवाळी