शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सलाम तुमच्या जिद्दीला! एक किमीवरून पाणी आणून शेतकरी महिलेनं जगवली आंब्याची कलमं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 22:58 IST

१०० कलमांची केली लागवड; शासनाकडून कुंपण, ठिबक सिंचनसाठी मदतीची अपेक्षा

- प्रकाश कदम पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील खडकवणे-दत्तवाडी येथील महिला शेतकरी कलावती एकनाथ कदम यांनी कृषी विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १०० कलम आंबा लागवड केली आहे. यासाठी शासनाचे ३ वर्षे अनुदान देय आहे.मात्र कलावती कदम व पती एकनाथ कदम या दाम्पत्याने हा परिसर दुर्गम, डोंगराळ असतानाही अथक मेहनत व परिश्रम घेत आंबा लागवडीनंतर सुमारे एक किमी अंतरावरून हंड्याने पाणी आणून, तसेच गतवर्षी पडलेल्या पावसाचे पाणी ३ टाक्यांमध्ये साठवूनसर्वच १०० झाडे जगविण्याचा विक्रम केला आहे.तालुका कृषी विभाग यांच्याकडून, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांना विनामूल्य १०० आंबा कलमांची झाडे मिळाली. शासनाच्या निकषानुसार ०.२५ क्षेत्रात माळरानावर शेतात ३ बाय ३ आकाराचे खड्डे खोदून त्यात शेण, पालापाचोळा टाकून, ते कुजवून ५ बाय ५ मीटर अंतरावर त्यांनी लागवड केली आहे.पहिल्या वर्षी हंड्याने डोक्यावर सुमारे १ कि.मी. अंतरावरून पाणी आणून प्रत्येक दिवशी प्रति झाड १ ते २ लीटरप्रमाणे कदम यांनी पाणी दिले. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात शेतात एक प्लॅस्टिक छप्पर तयार करून पनेल लावून पावसाचे तीन टाक्यांमध्ये सुमारे १० हजार लीटर पाणी साठवले. सद्यस्थितीत प्रति झाड १ ते २ लीटर पाणी झाडांना दिले जाते, आणि वेळप्रसंगी बिसलरी कॅन भरून आणि हंड्याने पाणी आणून रोपांचे संवर्धन केले जाते.आंबा कलमांच्या लागवडीसाठी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ व कृषी सहायक दत्तात्रेय नरुटे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कदम सांगतात. सध्या वणवा लागण्याचे प्रकार परिसरात वाढले आहे. अशा वेळी रोपांच्या सुरक्षेसाठी त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागतात. त्यांनी शेतातील गवत साफ करून, आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला आहे. बाहेरील वणव्याची झळ रोपांना बसू नये म्हणून आधीच कुंपणाच्या आजूबाजूचा परिसर जाळून घेतला आहे.काम सांभाळून संवर्धनशासनाने बोअरवेल मारल्यास ठिबक सिंचनद्वारे झाडांचे संवर्धन करता येईल, अशी अपेक्षा कदम दांपत्याने व्यक्त केली आहे. कलावती या आशा सेविका असून वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे गावोगावी फिरून घर व शेतीची कामे सांभाळून झाडांची मुलांप्रमाणे काळजी घेत आहेत. तर त्यांचे पती एकनाथ दिव्यांग असूनही परिस्थितीवर मात करून पत्नीसोबत झाडांना पाणी घालणे, निगा राखणे यासाठी मेहनत घेत आहेत.