शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

औषध निर्माण प्रकल्पासाठी सिडकाेचे नियम लावा- आमदार जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 23:52 IST

रोहा तालुक्यातील सात आणि मुरूड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे.

रायगड /मुरुड : राेहा आणि मुरूड तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या औषध निर्माण प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. हा भाग आता सिडकाेच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकाेच्या नियमानुसारच खरेदी कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केली.

रोहा तालुक्यातील सात आणि मुरूड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. आम्हाला विकास हवा आहे, पण स्थानिकांना भकास करणारा विकास काय कामाचा? असा सवाल आमदार पाटील यांनी व्यक्त केला. आपला कुठल्याही विकासाला विरोध नाही. पण स्थानिकांना देशोधडीला लावणारा विकास होणार असेल तर मात्र संघर्ष करावाच लागेल.

फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा सर्वप्रथम हा प्रस्ताव विधान परिषदेत आला त्या वेळेसदेखील मी सांगितले की, सिडकोला विरोध नाही. पण सिडकोने यापूर्वी ज्या नियमांच्या आधारे जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्याच नियमांच्या आधारे रोहा, मुरूड तालुक्यातील जमिनी अधिग्रहित करा. तसे झाल्यास शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड मिळू शकेल. मागील दोन-तीन वर्षांत मातीमोल किमतीने येथील जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. 

गोरगरीब शेतकऱ्यांची दिशाभूल करून या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत ते आता चढ्या दराने जमिनी विकणार आहेत. त्यामुळे त्यातील ५० टक्के हिस्सा हा शेतकऱ्यांना द्या, तसेच ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांचे आर्थिक स्रोत तपासले पाहिजेत, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

जमिनी अधिग्रहित करण्यात येतील तेव्हा सदर जमिनीच्या मूळ मालकाला पन्नास टक्के मोबदला दिलाच पाहिजे ही सर्वप्रथम मागणी असणार आहे. या विभागात अनेक जमिनींचे खोटे व्यवहार झाले आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात यावी. कुशल-अकुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने प्रशिक्षण संस्था उभारून येथील युवकांना मोफत प्रशिक्षण द्यावे. वाढीव गावठाण, वाढीव एफएसआय, रोजगार, प्रदूषण, जमिनीचा मोबदला यापैकी कुठल्याही विषयावर चर्चा न करता, येथील जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादला जाणार असेल तर हे स्थानिकांना फसविण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. आपल्या हक्काचा लाभ मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनदेखील आमदार पाटील  यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड