शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने कामात वाढवली गती! नागाव, चौलमध्ये चोवीस तासात दिले 11 ग्राहकांना वीज कनेक्शन

By राजेश भोस्तेकर | Updated: August 18, 2023 18:15 IST

अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल येथील अकरा ग्राहकांची घरे महावितरणने चोवीस तासात विजेने झळकवली आहेत.

अलिबाग (रायगड) : पूर्वी नवीन वीज कनेक्शन घ्यायचे झाले तर अनेकदा महावितरण कार्यालयाचे उंबरडे झिजवावे लागत होते. मात्र आता महावितरण प्रशासनही गतिमान होऊ लागले आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल येथील अकरा ग्राहकांची घरे महावितरणने चोवीस तासात विजेने झळकवली आहेत. त्यामुळे महावितरण विभागाने ही कामाची गती वाढवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधी पोयनाड विभागात पाच तासात १८ ग्राहकांना वीज जोडणी केली होती.

नवीन वीज जोडणी घेऊन इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश सर्व परिमंडलांना दिले होते. या कामाबाबत मुख्य अभियंता सुनिल काकडे प्रत्येक मंडळाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यानुसार महावितरण अलिबाग येथील नागाव शाखेत ११ अर्जदारांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासांच्या आत वीज जोडण्या देण्यात आल्या.   राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवीन वीज जोडणीच्या कामाला वेग देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे, वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी २४ तासाच्या आत वीज जोडणी देण्याचे प्रयत्न कर्मचारी करत आहेत. ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. कागद पत्रांची पडताळणी करून त्यांच्याकडून आवश्यक शुल्क भरून घेतल्यानंतर काही तासातच वीज जोडणी करतात. नागाव विभागात अशा अकरा ग्राहकांना वीज जोडणी करून दिली आहे. 

गुरुवारी १७ ऑगस्ट २०२३ रोजी महावितरणच्या नागाव व चौल भागात नवीन वीज जोडणीसाठी एकूण ११ अर्ज प्राप्त झाले. कार्यकारी अभियंता, अलिबाग शैलेश कुमार व अति. कार्यकारी अभियंता अलिबाग उपविभाग १ प्रशांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासाच्या आत ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या. याबाबत, अधीक्षक अभियंता पेण इब्राहीम मुलाणी यांनी त्यांचे कौतुक केले. अर्ज केल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळाल्याबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या नागाव शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

टॅग्स :Raigadरायगडelectricityवीज