शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जयंतीनिमित्त मिरवणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:23 IST

रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने संस्था, संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अलिबाग शहरामधून जैन बांधवांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये आबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जैन बांधवांनी आपल्या व्यापाराचे जाळे पसरवले आहे. अलिबाग येथील जैन मंदिर परिसरातून सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती.शहरातील विविध भागांतून मिरवणूक मार्गक्र मण करीत महावीर मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीमध्ये जैन धर्मीयांचे धार्मिक अधिष्ठान लाभलेले गुरू, जैन बांधव, महिला, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग शहरामध्ये विविध संस्था एकत्र येऊन आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले. रक्तदात्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागतही करण्यात आले. अलिबाग शहरातील कच्छ युवक संघ मुंबई, कच्छी भवन ट्रस्ट अलिबाग, प्रशांत नाईक मित्रमंडळ, रायगड जिल्हा शिवराष्ट्र संघटना, स्वराज्याचे शिलेदार, अलिबाग रोटरी क्लब, रायगड मेडिकल असोसिएशन, मिनीडोर चालक मालक संघटना, लायन्स क्लब यासारख्या विविध संघटना एकत्र आल्या. त्यांच्यामार्फत शहरातील कच्छी भवन येथे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यंदा ३२८पेक्षा जास्त रक्ताच्या बॅगा जिल्हा रु ग्णालयाला देण्यात आल्याचे लायन्सक्लबचे अध्यक्ष नयन कवळे यांनी सांगितले.बाजारपेठेतून पालखीखोपोली : जैन समाजातर्फे खोपोलीत महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जैन मंदिराजवळ पाणपोई उभारण्यात आली.त्याचे उदघाटन नगराध्यक्ष सुमन औसरमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, समीर मसुरकर, नगरसेविका विनिता कांबळे, तसेच जैन समाजाचे मान्यवर नेते, उद्योजक व व्यापारीवर्ग उपस्थित होते. यावेळी मोहन औसरमल यांनी आपले विचार मांडले. बाजारपेठेतून पालखी काढण्यात आली. यात जैन समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक होते. यावेळी पारंपरीक भजने विमलनाथ युवक भजनी मंडळाने सादर केली. कार्यक्र माचे आयोजन श्री विमलनाथ जैन नवयुवक भक्ती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ओसवाल व समाजबांधवांनी केले होते.रसायनीतील मिरवणुकीत आबालवद्धांचा सहभागरसायनी : भगवान महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त मोहोपाडा येथील आदिनाथ जैन श्वेतांबर संघातर्फे भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक सवाद्य आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरापासून निघून बाजारपेठ, शिवाजी चौक, नाक्यावरून, नवीन पोसरीतून पुन्हा मंदिरात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने जैन महिला, मुले व पुरुष बांधव सहभागी झाले होते.महाडमध्ये महावीरांच्याप्रतिमेची मिरवणूकमहाड : महाडमध्ये जैन बांधव संघटनेच्या वतीने महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ज्येष्ठ व्यापारी लादूलाल जैन, जैैन समााजाचे अध्यक्ष चंंदूलाल कोठारी, दिलीप जैैन, महावीर जैन, माजी नगरसेवक दिनेश जैन, निलेश ओसवाल, बाबूूूलाल जैन आदी सहभागी झाले होते.