शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:14 IST

अलिबाग, पेण, उरणमध्ये भाजपच्या उमेदवारीची चर्चा : शिवसेना उमेदवारांची धाकधूक वाढली, आघाडीचे देव पाण्यात

- आविष्कार देसार्ई अलिबाग : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असतानाही अद्याप शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. अलिबाग, पेण आणि उरण विधानसभेच्या जागा लढण्यासाठी भाजपकडून अनुक्रमे अ‍ॅड. महेश मोहिते, रवींद्र पाटील आणि महेश बालदी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.शिवसेना-भाजप यांची युती होणार की नाही याबाबतचे गूढ अद्यापही कायम असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘युती विरोधात आघाडी’ अशी लढत होणार आहे. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे; मात्र शिवसेना-भाजप युतीची घोषणा अद्यापही झाली नाही. शिवसेना-भाजप यांची युती न होणेच आघाडीसाठी फायद्याचे असल्याने त्यांनीही देव पाण्यात बुडवून ठेवल्याचे बोलले जाते.अलिबाग विधानसभा मतदारसंघाची जागा १९९० पासून शिवसेना लढवत आली आहे. मात्र त्यामध्ये त्यांना एकदाही विजय संपादित करता आलेला नाही. तसेच उरण मतदारसंघाची २००९ साली पुनर्रचना झाल्यानंतर शिवसेनेने २०१४ साली प्रथम ही खिंड लढवली होती. त्या वेळी शिवसेनेचे मनोहर भोईर हे निवडून आले. पेण विधानसभा मतदारसंघावर नजर टाकल्यास १९९० साली प्रथम भाजपने ही जागा लढवली होती. त्यानंतर १९९५ साली पुन्हा भाजपच्याच वाट्याला हा मतदारसंघ आला होता. नंतर १९९९, २००४ आणि २००९ साली शिवसेनेने येथे नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता.अलिबाग, पेण आणि उरण मतदारसंघाचा विचार केल्यास उरण वगळता शिवसेनेला अन्य ठिकाणी यश आल्याचे दिसत नाही. जागावाटपाचे अद्यापही पक्के झालेले नाही. आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपला या तीन जागा खुणावत असल्याचे बोलले जाते. उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी, अलिबागमध्ये भाजपचेच अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नावाची चर्चा आहे. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केले आहे. तर पेण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द दिल्याने त्यांनीही तयारी सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसते. अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून या जागेवर दावा सांगितला जात असल्याचे समजते. परंतु उरणमध्ये सध्या शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच हक्क अधिक आहे. तर पेणमध्ये रवींद्र पाटील हे भाजपमध्ये आल्याने भाजपसह पाटील यांचीही ताकद वाढली. पेण आणि अलिबाग या जागेवर शिवसेना लढत आली आहे मात्र त्यांना विजय संपादन करता आलेला नाही. पाटील यांना उमेदवारीचा दिलेला शब्द आणि पाटील यांनी सुरू केलेली तयारी यामुळे युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अलिबागच्या जागेवरही भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी आणि दुसरे इच्छुक उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांची धाकधूक वाढली आहे.युती न झाल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणारशिवसेना-भाजपची युती न झाल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा हा थेट आघाडीच्या उमेदवारांना मिळणार आहे. जोपर्यंत युतीच्या जागांबाबत स्पष्ट होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले; तर शिवसेना आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले.शिवसेना-भाजप यांची युती होणार की नाही याबाबतचे गूढ अद्यापही कायम असल्याने सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना