शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Vidhan Sabha 2019: २२ लाख ६५ हजार ४७८ मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:19 IST

जास्त संख्येने मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर केला आहे. २२ लाख ६५ हजार ४७८ मतदार या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरले आहेत. रायगड जिल्ह्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी रविवारी येथे दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात एकाच टप्प्यात २१ आॅक्टोंबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. ४ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ५ आॅक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे, तर ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २४ आॅक्टोंबर २०१९ रोजी मतमोजणीची प्रक्रीया पार पडणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितेल.जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्र म घोषित केला असल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रि या पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे आणि सरकारी वाहनांचा वापर, एकत्रीत निधीतून सरकारी जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, सरकारी सार्वजनिक/ खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरणे अशा विविध बांबीवर निर्बंध लावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र मामध्ये एकूण २५ हजार ८६९ मतदारांची वाढ झाली आहे. एसईव्हीव्हीपी या कार्यक्र मांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्र म राबविण्यात आले. अन्य सरकारी विभाग, असरकारी संस्थाच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचिवण्यात आला. स्विप अंतर्गत निवडणूक साक्षरता क्लब, पथनाटय, आदिवासी पाडयांवर विशेष मोहीम, महिलांसाठी तसेच १८ ते १९ वयोगटातील मतदारांचे प्रमाणे वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर खर्च सनियंत्रण समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या आणि उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने उपस्थित होते.२२ लाख ६५ हजार ४७८ मतदारजिल्ह्यात ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत ११ लाख ५२ हजार ९११ पुरु ष मतदार, ११ लाख १२ हजार ५६३ महिला मतदार तर ४ इतर असे एकूण २२ लाख ६५ हजार ४७८ मतदारांची नोंदणी झाली आहे. २०१४ सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये २ लाख ८९ हजार २०६ इतकी वाढ झाली आहे.२०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरु षांमागे ९५५ महिला असे प्रमाण आहे. त्या तुलनेत २०१४ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९५४ इतके होते. तर २०१९ मध्ये या प्रमाणात ९६५ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत १२०१ इतक्या सैन दलातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. २०१४ साली मतदारांना वाटप करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार ओळख पत्राचे प्रमाणे ९४.१० होते, तर २०१९ मध्ये हे प्रमाण ९६.२५ टक्के इतके झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘अ‍ॅक्सेसेबल इलेक्शन’ हे घोषवाक्यदिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने सुलभ निवडणूका म्हणजेच अ‍ॅक्सेसेबल इलेक्शन हे घोषवाक्य जाहीर केले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या १६ हजार ९०१ इतकी आहे. जुलै-आॅगस्ट २०१९ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्र म राबविण्यात आला. या कार्याक्र माची माहिती जनतेला व्हावी यासाठी व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. सुटटयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले.२ हजार ७१४ मतदान केंद्रेजिल्ह्यात नियमित मतदान केंद्राची संख्या २ हजार ६९३ आहे. सहाय्यकारी मतदान केंद्राची संख्या २१ आहे, अशी एकूण मतदान केंद्राची संख्या २ हजार ७१४ आहे. या मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअर वरील दिव्यांगासाठी योग्य रु ंदीचा दरवाजा, फर्निचर अशा किमान सुविधा पुरविण्यात येणार आहेत.निवडणुकीसाठी कर्मचारी सज्जविधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पाडावी. यासाठी सुमारे १३ हजार ९०० इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुरेसे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. जिल्हयांमध्ये विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये वापरण्यांत येणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. जनजागृती कार्यक्र म सुरु झाला आहे. आतापर्यंत ३६ हजार ८०७ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. ३३ हजार ७३८ लोकांनी प्रत्यक्षअभिरु प मतदान करु न पाहिलेले आहे.आयटी अ‍ॅप्लिकेशन्स विकसितयंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांच्या प्रभावी अंमजबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने काही आयटी अ‍ॅप्लीकेशन्स विकसीत केले आहेत. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हीजल हे मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे. पीडब्ल्युडी अ‍ॅप दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे आदी सोयी उपलब्ध करु न घेण्यासाठी हे आयटी अ‍ॅप्लीकेशन्स उपलब्ध करु न देण्यात आले आहे. राजकीय पक्षांना प्रचार सभा, निवडणूका आदी परवानगीसाठी तसेच अन्य अनेक सुविधांसाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.१९५० क्रमांकाची हेल्पलाइनजिल्हास्तरावर डिस्ट्रीक्ट कॉनटॅक्ट सेंटर स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्र ारींचे निवारण करण्यासाठी १९५० या टोल फ्री क्र मांकाची सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे.निवडणूक यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहनही निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी. या दृष्टिने चोख कायदा व सुव्यवस्था राखण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य पोलीस आणि सीएपीएफ यांचे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. अवैध पध्दतीने मद्य, रोख रक्कम अथवा अन्य प्रलोभनांचा वापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. बँकांमधून होणाºया मोठया रकमांच्या व्यवहारांवर देखील लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टिने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहनही सूर्यवंशी यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान