शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेचे मनोमिलन, अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 02:49 IST

शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वादळ शमले असतानाच आता शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका कसा बसू शकतो, हे गुरुवारी भाजप आणि शिवसेनेच्या मनोमिलनाचा संदेश देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले.

अलिबाग : शिवसेना आणि भाजप यांच्यामधील वादळ शमले असतानाच आता शिवसेनेला अंतर्गत नाराजीचा फटका कसा बसू शकतो, हे गुरुवारी भाजप आणि शिवसेनेच्या मनोमिलनाचा संदेश देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले.अलिबाग विधानससभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी सुरेंद्र म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच मातोश्रीच्या पायऱ्या झिजवल्या आहेत. मात्र, विधानसभेची उमेदवारी ही महेंद्र दळवी यांना मिळाली. उमेदवारी न मिळल्याचे शल्य ते लपवू शकले नाहीत आणि त्यांचा तोल सुटला असावा, अशी चर्चा पत्रकार परिषद संपल्यानंतर भाजप कार्यालयात सुरू होती.महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत २०१४ साली अलिबाग विधानसभेची प्रथम निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांचा सुमारे १५ हजार मतांनी शेकापचे उमेदवार सुभाष पाटील यांनी पराभव केला होता. त्या वेळीही सुरेंद्र म्हात्रे हे उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, तेव्हाही त्यांना नशिबाने हुलकावणी दिली. २०१९ साली होत असलेल्या विधानसभेसाठी त्यांनी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यांना आताही नशिबाने साथ दिली नाही.मातोश्रीवरून आलेल्या आदेशानुसार आपल्या उमेदवारांला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे असल्याचा आदेश प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून युतीचा धर्म पाळण्याबाबतचा संदेश जिल्ह्णातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आला होता. महेंद्र दळवी यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी शिवसेनेसह भाजपचेही पदाधिकारी विशेष म्हणजे बंडखोरीच्या तयारीत असलेले अ‍ॅड. महेश मोहितेही उपस्थित होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.एकदिलाने काम करणार-मोहिते, दळवीआमच्या मनातील सर्व प्रश्न, चिंता मिटल्या आहेत. कोणतीही नाराजी राहिलेली नाही, युतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व एकदिलाने काम करणार, असे भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले. सुरेंद्र म्हात्रे हे महेंद्र दळवी यांना उमेदवारी मिळाल्याने खूश आहेत का? असा प्रश्न विचारला असता सुरेंद्र म्हात्रे यांच्या चेहºयावर नाराजीचे भाव दाटून आले.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raigadरायगड