शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: रणरागिणींच्या लढतीकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 05:10 IST

श्रीवर्धन, अलिबाग, पेण या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील अलिबाग, श्रीवर्धन आणि पेण मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरत आहेत. या मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांपुढे बलाढ्य पुरुष उमेदवांराचे आव्हान उभे राहिले आहे. श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विनोद घोसाळकर, अलिबागमध्ये अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांना शेकापचे सुभाष पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचे, तर पेण मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांना भाजपचे रवींद्र पाटील यांच्यासोबत दोन हात करावे लागणार आहेत. या तीन महिला रणरागिणी बलाढ्य पुरुष उमेदवारांचा कसा मुकाबला करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.श्रीवर्धन, अलिबाग, पेण या ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. या तीनही महिला उमेदवारांसमोर मोठे आव्हान असतानाच बंडखोरीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. रायगडमधील १९५२ सालापासून निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिलेली नाही, अपवाद फक्त शेकापच्या मीनाक्षी पाटील या आहेत. पक्षाने त्यांना १९९५, १९९९ आणि २००९ साली उमेदवारी दिली होती. त्यामध्ये त्यांचा विजय झाला होता. २००४ साली मात्र काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांनी त्यांना पराभवाची चव चाखायला लावली होती. हा कालावधी पाहता अन्य कोणत्याच प्रमुख राजकीय पक्षाने महिला उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, अथवा सक्षम महिला उमेदवाराचे नेतृत्व कोणत्याच राजकीय पक्षाला उभे करता आलेले नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.२०१९ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन आणि पेण मतदारसंघामध्ये राजकीय पक्षाने महिलांना उमेदवारी दिल्याने महिलांच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकल्याचे दिसते. त्यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघामध्ये काँग्रेसने अनुक्रमे अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर आणि पेणमध्ये नंदा म्हात्रे यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. अलिबागमध्ये अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे सुभाष पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार त्यांचेच दीर राजेंद्र ठाकूर यांचे आव्हान आहे.पेणमध्ये नंदा म्हात्रे यांना भाजपचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्यासह शेकापचे धैर्यशील पाटील यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेच्या अदिती तटकरे यांना शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. याच मतदारसंघात काँग्रेसच्या तीन जणांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे अदिती यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे.महिला उमेदवारांची संख्या वाढली- निवडणुकीच्या रिंगणामध्ये पुरुष उमेदवारांच्या विरोधात महिला उमेदवार कशी लढत देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या त्या मतदारसंघातील मतदार हे निवडणुकीत कोणाच्या बाजूने राहणार हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.तूर्तास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना विधानसभेचे तिकीट देऊन रायगड जिल्ह्यात निश्चितपणे वेगळा पायंडा पाडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.महिलांना उमेदवारी देण्याचा शेकापनेच पाडला पायंडारायगडमधील १९५२ सालापासून निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास प्रमुख राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिलेली नाही. अपवाद फक्त शेकापच्या मीनाक्षी पाटील यांचा आहे. शेकापने त्यांना १९९५, १९९९ आणि २००९ साली उमेदवारी दिली होती. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पेलत विजयश्री खेचून आणली होती. महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्याचा खरा पायंडा हा शेकापने पाडला आहे. हा राजकीय इतिहास कोणालाच विसरून चालणार नाही. त्या पाठोपाठ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव जोडले गेले आहे.

टॅग्स :alibag-acअलिबागshrivardhan-acश्रीवर्धनpen-acपेण