शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पाच मतदारसंघात युतीविरोधात आघाडीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 02:55 IST

रायगड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे

- आविष्कार देसाईअलिबाग : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीविरोधात युती अशीच लढत सध्या पाहायला मिळत आहे; परंतु उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्याविरोधात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली आहे. त्याला प्रतिउत्तर देताना शिवसेचे बबन पाटील यांनी पनवेल मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून शड्डू ठोकला आहे. महेश बालदी हे माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसत असल्याने पनवेलमध्ये शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार हे ७ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.सात विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने उरण, पनवेल, श्रीवर्धन आणि पेण मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. उरणमध्ये शिवसेनेच मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी तसेच पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेकापचे हरेश केणी आणि शिवसेनेचे बबन पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महेश बालदी आणि बबन पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास लढतीचे चित्र शेकापविरोधात भाजप असेच दिसू शकते.श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या प्रथमच आपले नशिब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथीही युती विरोधात आघाडी असेच चित्र दिसणार आहे. अदिती या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या असल्याने मुलीला निवडून आणण्यासाठी सुनील तटकरे जीवाचे रान करतील यात काहीच शंका असण्याचे कारण नाही. शिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघाने सुमारे ३१ हजारांचे मताधिक्य दिले होते.याच मतदारसंघातून अदिती यांचे चुलत भाऊ अवधूत तटकरे लढणार असे बोलले जात होते. मात्र, त्यांचे नाव मागे पडून थेट विनोद घोसळकर यांनाच शिवसेनेने अधिकृत उमेदवारी दिली.पेण मतदारसंघामध्ये शेकापचे धैर्यशील पाटील हे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. त्यांची लढत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री रवींद्र पाटील यांच्याशी होणार आहे. उरणमध्ये भाजपने बंडखोरी केल्याने शिवसेनेनेही नरेश गावंड यांना पेणमध्ये उतरवण्याती तयारी केली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करून या मतदारसंघाला बंडखोरीच ग्रहण लागले नाही. रवींद्र पाटील यांचा सामना धैर्यशील पाटील यांच्याबरोबर आधी झाला आहे. धैर्यशील पाटील यांनी त्यांना आस्मान दाखवले होते. आताही प्रतिस्पर्धी तेच आहेत, त्यामुळे पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पाटील हे मैदानात उतरल्याचे दिसून येते.महाडमध्ये शिवसेना-काँगे्रस सामना रंगणारमहाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले हेही हॅट्ट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा सामना हा काँग्रेसचे माणिक जगताप यांच्याबरोबर आहे. मागील निवडणुकीत गोगावले यांनी जगताप यांना चारीमुंड्या चित केले होते, त्यामुळे जिव्हारी लागलेल्या परभवाची परतफेड करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.कर्जतमध्येही तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड ताकद लावणार असे दिसत असताना त्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. नाट्यमयरीत्या उमेदवारीची माळ पुन्हा लाड यांच्याच गळ्यात पडली आहे. शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्याशी त्यांचे दोन हात होणार आहेत.अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकापचे सुभाष पाटील यांचा सामना शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याशी होणार आहे. मागील निवडणुकीत दळवी यांना पाटील यांनी विजयश्रीपासून रोखले होते. तेही या वेळी तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.नाराजीचा फटका बसण्याची शक्यताजिल्ह्यात काँग्रेसची म्हणावी तशी ताकद असल्याचे दिसून येत नाही. मागील विविध निवडणुकींचा आलेख बघता तो घसरलेलाच असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.शिवसेना-भाजप यांची युती होणार नसल्याचे गृहित धरून दोन्हीकडील उमेदवार हे निवडणूक लढण्याच्या तयारीत होते, त्यांनी तयारीही केली होती; परंतु आता युती झाल्याने त्यांची स्वप्न भंगली आहेत.त्यामुळे नाराज असलले एकमेकांना किती मदत करतील याबाबतही सांशकतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raigadरायगड