शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : रायगडमधील सात विधानसभा मतदारसंघात ६२ अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 02:49 IST

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सर्वच पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे महेंद्र दळवी, काँग्रेसकडून राजेंद्र ठाकूर, पेणमधून महायुतीचे रवींद्र पाटील, कर्जत आघाडीकडून सुरेश लाड, श्रीवर्धनमधून महायुतीचे विनोद घोसाळकर, आघाडीकडून अदिती तटकरे, महाड आघाडीकडून माणिक जगताप, पनवेलमध्ये महायुतीचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये शेकापकडून विवेक पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले.अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर आहे. त्यामुळे काही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रमुख पक्षातील दिग्गज उमेदवारांनी गुरु वारचा मुहूर्त साधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात ३ आॅक्टोबरपर्यंत ५२ उमेदवारांनी ६२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बहुतांश लढतीचे चित्र स्पष्ट होत असले, तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिवशीच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.कर्जतमध्ये तीन अर्ज दाखलकर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरु वारी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक कार्यालयातून २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत ४४ अर्ज घेऊन जाण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात गुरु वारपर्यंत चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. १ आॅक्टोबर रोजी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने अ‍ॅड. गोपाळ गुंजा शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुरु वार, ३ आॅक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व समविचारी पक्षाच्या महाआघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार सुरेश नारायण लाड, बहुजन समाज पार्टी (बसपा) सुरेश चिंतामण गायकवाड आणि जनहित लोकशाही पार्टीच्या वतीने किशोर नारायण शितोळे यांनी गुरु वारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली.पनवेलमध्ये आठ उमेदवारी अर्जपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये गुरुवारी आठ नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले. अद्यापपर्यंत ३५ नामनिर्देशित पत्रांचे वाटप झाले असून एकूण दहा उमेदवारी अर्ज पनवेल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. दाखल केलेल्या अर्जामध्ये भाजपच्या वतीने प्रशांत ठाकूर, अरुण भगत, हरेश केणी, संजय चौधरी, कांतीलाल कडू यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कांबळे) श्याम डिंगळे, इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टीच्या वतीने राजीव सिन्हा आदीनी उमेदवारी अर्ज पनवेल येथील प्रांत कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे भरले आहेत. शनिवारी अर्जाची छाननी होणार असून सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, गुरुवारी आठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याने उमेदवारी अर्जाची संख्या दहावर गेली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raigadरायगड