शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 23:56 IST

नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी : पोलीस परेड मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग : आगरी, कोळी, आदिवासी समाज यांनी येथील सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. विविध जाती-धर्माचे नागरिक येथे सलोख्याने आणि शांततामय वातावरणात राहतात. हेच रायगड जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी या वेळी जागतिक कामगार दिनाच्या कामगारवर्गाला शुभेच्छाही दिल्या.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सकाळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला रायगड किल्ला याच जिल्ह्यात आहे. केवळ गड-किल्ले नाही, तर या जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारे, बहरलेली जंगले, नयनरम्य धबधबे, थंड हवेची ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे, यामुळे ही भूमी खऱ्या अर्थाने कोकणचीच राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेला चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा म्हणजे या भूमीतून झालेली सामाजिक न्यायाची अभूतपूर्व क्रांती होती. कान्होजी आंग्रे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महान विचारवंत विनोबा भावे, सी.डी. देशमुख यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, कर्मचारी यांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजारोहणतत्पूर्वी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथेदेखील जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र