शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीविरोधात धाटावमध्ये महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:18 IST

धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता.

रोहा : धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता. डीएमसी कंपनीच्या गेटसमोरून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर महारॅली काढून मोर्चा सुदर्शनमार्गे रोहा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात धाटाव, वरसे विभागातील हजारो नागरिक, सहभागी झाले होते. यात तरुणांची संख्याही मोठी होती. मोर्चात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता.धाटाव पंचक्र ोशीत बहुजन समाज आयोजित धाटाव एमआयडीसीविरोधातील मोर्चाचे नेतृत्त बहुजन समाज बांधवांनी केले. या वेळी सुरेश मगर, ज्ञानेश्वर साळुंखे, अमित घाग, लीलाधर मोरे, शंकर भगत यांनी संबोधित केले. त्यानंतर हजारो तरुणांनी दुचाकी रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर, पोलीस आवाराबाहेर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्त्व करणारे सुरेश मगर यांनी, एमआयडीसी, एमपीसीबी, स्थानिक प्रशासन यांसह राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. आता मागण्यांचे बॅनर्स उभारले आहेत. मात्र, तरीही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा या वेळी मगर यांनी दिला.>मूलभूत सुविधांबरोबरच दूषित पाण्याचा प्रश्नएमआयडीसी होऊन जवळपास ५० वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप परिसराचा विकास झालेला नाही. या ठिकाणी मुबलक पाणी नाही, अद्ययावत रुग्णालय नाही, मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वेळी बाटलीबंद दूषित पाणी प्रांताधिकारी व एसपीसीबीच्या अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.