शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महाडच्या सांडपाणी वाहिनीला मंजुरीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:05 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधून खाडीपट्टा विभागात जाणाºया सांडपाणी वाहिनीच्या नूतनीकरणासाठी ७१ कोटी रुपये तत्काळ देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा जनतेची दिशाभूल करणारा आहे

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधून खाडीपट्टा विभागात जाणाºया सांडपाणी वाहिनीच्या नूतनीकरणासाठी ७१ कोटी रुपये तत्काळ देण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा जनतेची दिशाभूल करणारा आहे. ज्या ७१ कोटी रुपयांचा गाजावाजा केला जात आहे, तो प्रस्ताव २०१५चा आहे आणि आताच्या डीएसआरनुसार त्याचा खर्च १०० ते ३०० कोटी रुपयांच्या आसपास जाईल. ज्या प्रस्तावावर अद्याप कोणता विचारच झालेला नाही किंवा या कामाला मंजुरीच मिळालेली नाही, त्यासाठी ७१ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांनी जनतेला गृहित धरू नये आणि त्यांची दिशाभूलही करू नये, अशी भूमिका माजी आमदार माणिक जगताप यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मांडली.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनामध्ये आ. गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या वाहिनीसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याची वृत्ते गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना जगताप यांनी या बैठकीचा फोलपणा स्पष्ट केला. जगताप म्हणाले की, ज्या वेळस मंत्री अशा प्रकारची बैठक आयोजित करतात, त्या वेळेस त्या बैठकीला एक प्रकारचे गांभीर्य असते. या बैठकीला औद्योगिक विकास महामंडळाचे प्रधान सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी अनुपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना, शेतकºयांच्या प्रतिनिधींनाही या बैठकीला बोलाविण्यात आले नव्हते. त्यामुळे या बैठकीला कोणताही अर्थ नव्हता.७१ कोटी रुपयांचे हे ढोबळ अंदाजपत्रक २०१५मध्ये तयार करण्यात आले होते. त्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे ते परतही पाठविण्यात आले असून, ते महाड एमआयडीसी कार्यालयामध्येच पडून आहे. या कालावधीत दोन वेळेस डीएसआर बदलला आहे असे माणिक जगताप यांनी स्पष्ट के ले.