शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महाडचा मराठमोळा जवान भोपाळ बचावकार्यात शहीद, गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 17:25 IST

भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर  बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्या भारतीय सैन्य दलातील प्रथमेश दिलीप कदम हा  २६ वर्षीय जवान शहीद झाला

संदिप जाधव  

महाड - भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर  बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात गंभीररीत्या जखमी झालेल्या भारतीय सैन्य दलातील प्रथमेश दिलीप कदम हा  २६ वर्षीय जवान शहीद झाला. शहिद प्रथमेश याचे  महाड तालुक्यातील शेवते हे मुळ गाव असून या गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारी १२ मे ला भोपाळ येथे घडलेल्या रेल्वेच्या अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या सैन्य दलाच्या पथकात प्रथमेश कार्यरत असतानाच रेल्वेमध्ये अचानक स्फोट झाला. त्यावेळी गंभिररित्या जखमी झालेल्या प्रथमेशवर  दिल्लीतील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरु असताना काल मंगळवारी सकाळी१०.३० वा त्याचे निधन झाले. काल रात्री याबाबतची माहिती शेवते गावात समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे.प्रथमेश च्या पश्चात आई,वडील व एक विवाहित बहिण आहे.  

सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील प्रथमेश कदम याच्या कुटुंबाची चौथी पिढी सध्या भारतीय सैन्याच्या सेवेत असून आठ वर्षापूर्वी प्रथमेश सैन्यात दाखल झाला होता. प्रथमेश हा सध्या भोपाळ येथे सैन्य दलाच्या इएमइमध्ये कार्यरत होता.प्रथमेश याचे  वडील दिलीप कदम हे नाशिक मधील एका खाजगी रूग्णालयात काम करतात. गेल्या काही वर्षांपासून कदम कुटुंबाचे वास्तव्य नाशिक मध्येच आहे. नाशिक येथेच बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या प्रथमेश याला सैन्यात अधिकारी व्हायची  खुप इच्छा होती असे प्रथमेश याचे चुलते सुभाष कदम यांनी सांगितले.मात्र त्याची अधिकारी व्हायची इच्छा अपुरी राहिली असे सांगताना कदम यांना अश्रु अनावर झाले. प्रथमेश याचे शव दिल्ली येथून आज रात्री उशिरा खास विमानाने मुंबई मध्ये आणण्यात येणार असून गुरुवारी सकाळी शेवते गावात शहीद प्रथमेशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.प्रथमेश याचे वडील दिलीप  कदम व त्याची आई प्रतिभा कदम हे दिल्ली येथे रवाना झाले आहेत.

प्रथमेश सैन्यात असला तरी गणपती तसेच सणासुदीला तो शेवते गावात नेहमी यायचा. आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेला प्रथमेश गावातील सर्वांशी मिळून मिसळून वागायचा.त्याच्या या स्वभावामुळे प्रथमेश शेवते या गावात सर्वांचा आवडता होता. मात्र प्रथमेश च्या दुदैवी निधनाने संपूर्ण गावावरच दु:खाचा डोंगर कोसळल्याची भावना प्रथमेश याच्या गावातील मित्रांनी व्यक्त केल्या.

आज दुपारी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, निवासी नायब तहसीलदार दिपक कुडाळ यांनी शेवते गावात जाऊन कदम कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.