शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाड-विन्हेरे मार्ग दरड कोसळल्याने बंद, दरड हटवून वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 00:45 IST

महाडमधून खेडकडे जाणाऱ्या महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावर बुधवारी रात्री कुर्ले गावानजीक असलेल्या धरणाजवळ मातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दासगाव : महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावरील कुर्ले धरणाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद होता. गुरुवारी सकाळी दरड कोसळल्याचे निदर्शनास येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे ही माती रस्त्यावर पडत असून आणखी काही ठिकाणी धोका कायम आहे.महाडमधून खेडकडे जाणाऱ्या महाड विन्हेरे नातुनगर या पर्यायी महामार्गावर बुधवारी रात्री कुर्ले गावानजीक असलेल्या धरणाजवळ मातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंदी केल्याने या मार्गातील वाहतूक बंद असली तरी कुर्ले, आंबवली, रेवतळे, उंदेरी, शिरवली, विन्हेरे, फौजी आंबवडे आदी गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. यामुळे सकाळी महाडकडे दूध, भाजीपाला घेऊन येणाºया शेतकऱ्यांना आणि कारखान्यातील कामगारांना महाडमध्ये येता आले नाही. सकाळी सात वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीच अधिकारी अगर कर्मचारी तिकडे फिरकले नाहीत. त्यानंतर दरड कोसळल्याचे समजताच जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव काढण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत हा मार्ग खुला करण्यात आला.कुर्ले ते महाडदरम्यान असलेल्या वळणदार रस्त्यातील माती हटवून वळणांची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाजूने संपूर्ण माती असल्याने मुसळधार पावसात ही माती सुटण्यास सुरुवात होते. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसातदेखील अशीच स्थिती निर्माण झाली आहे. कुर्ले ते शिरगावदरम्यान अजून काही ठिकाणी अशीच दरड कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.खोदकाम के ल्याने माती येते खालीकुर्ले ते महाडदरम्यान असलेल्या वळणदार रस्त्यातील माती हटवून वळणांची रुंदी वाढविण्यात आली आहे. शिवाय गतवर्षी ज्या ठिकाणी माती रस्त्यावर आली त्या ठिकाणीदेखील खोदकाम करण्यात आले. मात्र, वरील बाजूने संपूर्ण माती असल्याने पावसात ही माती सुटण्यास सुरुवात होते.

टॅग्स :Raigadरायगड