शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीत कारखान्याचे रसायनयुक्त पाणी नाल्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:17 IST

महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत महाड एमआयडीसीमधील अनेक कारखानदारांनी सरळ कारखान्यांच्या शेजारी असलेल्या गटारातून रसायनयुक्त पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव  - महाड तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत महाड एमआयडीसीमधील अनेक कारखानदारांनी सरळ कारखान्यांच्या शेजारी असलेल्या गटारातून रसायनयुक्त पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महाड एमआयडीसीमधील गटारे रंगीत झाली आहेत. येथील लासा कंपनीच्या खुल्या जागेत तर लाल रंगाचे पाणी साचलेले दिसून येत आहे. मात्र, गटारात पाणी सोडल्याप्रकरणी सानिका कंपनीला नोटीस बजावली आहे.महाड एमआयडीसीमध्ये अधिकांश कारखाने हे रासायनिक उत्पादन करणारे कारखाने आहेत. यातून बाहेर पडणारे पाणी हे घातक असल्याने हे पाणी सामायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया करून खाडीत सोडले जात आहे. असे असले तरी आजही नाल्यावाटे सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांपासून महाड एमआयडीसी मधील नाले पुन्हा रंगीत पाण्याने वाहून निघाले आहेत. अद्याप पावसाने जम बसवला नसला, तरी काही दिवसांपासून विविध ठिकाणी रासायनिक रंगीत पाणी नाल्यावाटे वाहून जाताना दिसत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशन आणि लासा केमिकल या कंपनीच्या मधील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत तलाव निर्माण झाले आहे. या तलावाला लाल रंगदेखील आला आहे. हा लाल रंग येथील केमोसोल या कंपनीतील पाण्यामुळे आला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.शिवाय सानिका केमिकलच्या मागील बाजूसदेखील गटारात रसायनमिश्रित पाणी दिसून आले आहे. याबाबत अनेक वेळा सानिका केमिकल कंपनीला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, या वेळीही स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा नोटीस बजावण्याचे काम प्रदूषण मंडळाने केले आहे.ऐन पावसाळ्यात सांडपाणी शेजारील वाहत्या नाल्यात सोडून देणे हे प्रकार यापूर्वी सर्रास होत होते. सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, एमआयडीसीमधील मोठ्या कंपन्या स्वत:च्या ईटीपीमध्ये शुद्धीकरण करून सीईटीपीला देतात. छोट्या कंपन्या मात्र यामध्ये अजून कुचराई करत असून आपले पाणी नाल्यात अगर कंपनी परिसरात सोडून देत असल्याचे अशा प्रकारावरून उघड होत आहे.वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहारसानिका केमिकलच्या मागील बाजूस असलेल्या गटारात रासायनिक सांडपाणी आढळून आले आहे. या बाबत कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. शिवाय वरिष्ठ कार्यालयालाही कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे महाड येथील क्षेत्र अधिकारी प्रकाश ताट यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड