शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

माघी उत्सव भक्तिमय, मंदिरांत भाविकांची मांदियाळी; जिल्ह्यात ५८ ठिकाणी मोठा गणेशोत्सव

By निखिल म्हात्रे | Updated: January 25, 2023 19:03 IST

अलिबाग कुलाबा किल्ल्याला विद्युत रोषणाई, रंगबेरंगी पताका, आकर्षक रांगाेळ्या काढून भक्तांचा उत्साह द्विगुणित केल्याचे दिसून आले.

- निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध ५८ ठिकाणी माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यात अलिबाग किल्ल्यातील ३५० वर्षांपूर्वीचा आंग्रेकालीन गणेशपंचायतन, पाली येथील बल्लाळेश्वर, खालापूर-महडचा वरदविनायक आणि मुरुड-नांदगावच्या सिद्धिविनायक गणेश मंदिरांत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

अलिबाग कुलाबा किल्ल्याला विद्युत रोषणाई, रंगबेरंगी पताका, आकर्षक रांगाेळ्या काढून भक्तांचा उत्साह द्विगुणित केल्याचे दिसून आले. मुंबई, ठाणे, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. भरतीच्या कालावधीत भाविकांनी बोटीतून प्रवास करून बाप्पाचे दर्शन घेतले. तर काही भाविकांनी ओहोटी लागल्यावर किल्ल्यात जाणे पसंत केले. मोठ्या संख्येने येथे भाविक दाखल झाल्याने बोट सेवा आणि घोडागाडीला दिवसभर मागणी होती. दर्शनासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मंदिर परिसरामध्ये हार-फुले, पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले नाही. भाविकांमुळे अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गर्दी असल्याने जत्रेचे स्वरूप आले होते. त्या ठिकाणच्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्यांनी गजबजून गेले होते.

जिल्ह्यातील अनेक गणेश मंदिरांमध्ये सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले. तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात होता.

महाड, पालीत दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी -माघी गणेशोत्सवानिमित्ताने महड, सुधागड-पाली येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या नवसाला पावणाऱ्या वरदविनायक व बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातील भक्तांनी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. याच दिवशी उरण, खारपाले, पाबळ-झोपडे येथील मंडळे बल्लाळेश्वराची पालखी घेऊन पायी आले होते. त्या भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. उन्हामुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी देवस्थानकडून जागोजागी मंडप उभारण्यात आले होते. माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. दोन दिवसांच्या या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होते. या यात्रेत मोठमोठे आकाश पाळणे, फनीगेम, जादूचे प्रयोग, चायनामेड वस्तूंची दुकाने, महिलांना खरेदीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंची दुकाने तसेच बच्चेकंपनीसाठी खेळणी व मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. रात्रीच्या वेळेस मंदिराला केलेल्या रोषणाईने बल्लाळेश्वराच्या मंदिराचे दृश्य अगदी डोळ्याचे पारणे फेडून जाणारे असे दिसते.